मुंबईकरांचा रेल्वेवर ‘फॉलोआॅन’

By admin | Published: November 8, 2016 04:08 AM2016-11-08T04:08:38+5:302016-11-08T04:08:38+5:30

फिरकी गोलंदाज विजय गोहिलच्या (५/६४) भेदक माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रेल्वेचा पहिला डाव १६० धावांत गुंडाळून त्यांच्यावर फॉलोआॅन लादला

Mumbai's follow-on | मुंबईकरांचा रेल्वेवर ‘फॉलोआॅन’

मुंबईकरांचा रेल्वेवर ‘फॉलोआॅन’

Next

म्हैसूर : फिरकी गोलंदाज विजय गोहिलच्या (५/६४) भेदक माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रेल्वेचा पहिला डाव १६० धावांत गुंडाळून त्यांच्यावर फॉलोआॅन लादला. मुंबईच्या ३४५ धावांचा पाठलाग करताना रेल्वेच्या फलंदाजांनी गोहिलपुढे नांगी टाकली.
तिसऱ्या दिवशी ३ बाद ७६ धावांवरुन सुरुवात करताना रेल्वेचा कोणताही फलंदाज मुंबईकरांसमोर आव्हान उभे करु शकला नाही. गोहिलने ६४ धावांत अर्धा संघ बाद करताना रेल्वेची ‘चेन’ खेचली. तर, शार्दुल ठाकूर आणि बलविंदर सिंग संधू या अनुभवी गोलंदाजांनीही प्रत्येकी २ बळी घेत गोहिलला चांगली साथ दिली. कर्णधार कर्ण शर्मा (२४) याने रेल्वेकडून सर्वाधिक धावा काढल्या. तर, आशिष सिंगने २२ धावांची खेळी केली. या दोघांशिवाय कोणालाही वीसचा आकडा पार करता आला नाही. फॉलोआॅन पडल्यानंतर रेल्वेने तिसऱ्या दिवसअखेर ६५ षटकात ४ बाद १३५ धावांची मजल मारली. अजूनही रेल्वे ५० धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सहा फलंदाज शिल्लक आहेत. सलामीवीर सौरभ वाकासकर (३९) आणि अरिंदम घोष (३१) यांनी दुसऱ्या डावात रेल्वेला सावरण्याचा प्रयत्न केला. मुंबईकडून तुषार देशपांडेने ८ धावांत २ बळी घेत रेल्वेला रोखण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. दिवसअखेर फौझ अहमद (१२*) आणि नितिन भिल्ले (१७*) टिकून होते. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक :
मुंबई (पहिला डाव) : १३३.२ षटकात सर्वबाद ३४५ धावा.
रेल्वे (पहिला डाव) : ७०.३ षटकात सर्वबाद १६० धावा (कर्ण शर्मा २४, आशिष सिंग २२; विजय गोहिल ५/६४)
रेल्वे (दुसरा डाव) : ६५ षटकात ४ बाद १३५ धावा (सौरभ वाकासकर ३९, अरिंदम घोष ३१; तुषार देशपांडे २/८)

Web Title: Mumbai's follow-on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.