मुंबईकरांची स्थिती भक्कम
By admin | Published: January 4, 2017 03:26 AM2017-01-04T03:26:09+5:302017-01-04T03:26:09+5:30
कर्णधार आदित्य तरेच्या (८३) शानदार अर्धशतकी खेळीनंतर अभिषेक नायर (५८) व शार्दुल ठाकूर (५२) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईने रणजी स्पर्धेच्या
राजकोट : कर्णधार आदित्य तरेच्या (८३) शानदार अर्धशतकी खेळीनंतर अभिषेक नायर (५८) व शार्दुल ठाकूर (५२) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईने रणजी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तामिळनाडूविरुध्द पहिल्या डावात १०१ धावांची आघाडी घेतली. तामिळनाडूच्या ३०५ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा पहिला डाव ४०६ धावांत आटोपला.
चांगल्या सुरुवातीनंतर झटपट तीन बळी गमावल्याने मुंबईकरांचा डाव घसरला होता. यावेळी मुंबईला आघाडी मिळवता येईल की नाही अशी शंका नाही. मात्र तरे, नायर व शार्दुल यांनी संघाला मजबूत स्थितीमध्ये आणले. ४ बाद १७१ धावांवरून तिसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात करताना तरे आणि श्रेयश अय्यर (३६) यांच्यावर मुंबईची मदार होती.
अय्यर वैयक्तिक धावसंख्येत १२ धावांची भर घालून परतला. परंतु, तरे - नायर यांनी सहाव्या विकेटसाठी १२१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बाबा अपराजितने नायरला बाद करून ही जोडी फोडली. नायरने १४३ चेंडूत ९ चौकारांसह ५८ धावा काढल्या. नायरनंतर तरे देखील १८१ चेंडूत ९ चौकारांसह ८३ धावा काढून परतला. यानंतर बलविंदर संधू (३२) आणि अक्षय गिरप (५) देखील बाद झाल्याने मुंबईचा डाव पुन्हा घसरला. परंतु, शार्दुलने चिवट फलंदाजी करताना १२६ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५२ धावा काढून संघाला आघाडी मिळवून दिली.
शार्दुल मुंबईचा बाद होणारा अखेरचा फलंदाज ठरला. तर विजय गोहिलने ३६ चेंडंूत केवळ एका धावांवर नाबाद राहात त्याला उपयुक्त साथ दिली. तामिळनाडूकडून विजय शंकरने ५९ धावांत ४ बळी घेतले. तर बाबा अपराजितने २ बळी घेतले.
धावफलक
तामिळनाडू (पहिला डाव) : ११५.२ षटकात सर्वबाद ३०५ धावा.
मुंबई (पहिला डाव) : पृथ्वी शॉ झे. कार्तिक गो. अश्विन क्रिस्ट ४, प्रफुल्ल वाघेला धावबाद (मुकुंद/कार्तिक) ४८, सूर्यकुमार यादव झे. कार्तिक गो. शंकर ७३, आदित्य तरे झे. गंगा राजू गो. नटराजन ८३, सिध्देश लाड झे. मुकुंद गो. औशिक श्रीनिवास ०, श्रेयश अय्यर झे. कार्तिक गो. शंकर ३६, अभिषेक नायर पायचीत गो. अपराजित ५८, बलविंदर संधू झे. कार्तिक गो. शंकर ३२, शार्दुल ठाकूर त्रि. गो. अपराजित ५२, अक्षय गिरप झे. कार्तिक गो. शंकर ५, विजय गोहिल नाबाद १. अवांतर - १४. एकूण : १५०.३ षटकात सर्वबाद ४०६ धावा.
गोलंदाजी : अश्विन क्रिस्ट १८-१-७५-१; टी. नटराजन २९-७-१०५-१; के. विग्नेश १७-१-५७-०; औशिक श्रीनिवास ३९-१३-६२-१; बाबा अपराजित १८.३-३-३५-२; विजय शंकर २०-३-५९-४; गंगा श्रीधर राजू ८-३-५-०; अभिनव मुकुंद १-०-३-०.