मुंबईचा निसटता पराभव

By admin | Published: May 12, 2017 01:04 AM2017-05-12T01:04:05+5:302017-05-12T01:11:26+5:30

अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेले २३१ धावांचे आव्हान पार करण्यात थोडक्यात अपयशी

Mumbai's slump defeat | मुंबईचा निसटता पराभव

मुंबईचा निसटता पराभव

Next

रोहित नाईक । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेले २३१ धावांचे आव्हान पार करण्यात थोडक्यात अपयशी ठरल्याने मुंबई इंडियन्सला ७ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. यानंतरही मुंबईने अव्वल स्थान कायम राखले असले तरी, प्ले आॅफमध्ये अव्वलस्थानासह जाण्यासाठी त्यांना अखेरच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुध्द विजय आवश्यक आहे. तसेच, पंजाबने आपल्या प्ले आॅफ गाठण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने दिलेल्या २३१ धावांचा पाठलाग करताना मुंबईने २० षटकात ६ बाद २२३ धावा केल्या. लेंडल सिमन्स - पार्थिव पटेल यांनी ९९ धावांची आक्रमक सलामी देत मुंबईला आवश्यक सुरुवात करुन दिली. या दोघांनी पंजाबला तोडीस तोड उत्तर देत मुंबईच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, पार्थिव (३८) बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने मुंबईला धक्के बसले. यानंतर आक्रमक अर्धशतक झळकावणारा सिमन्सही (३२ चेंडूत ५९ धावा )परतल्याने मुंबईच्या धावगतीला ब्रेक लागला. नितिश राणा (१२), रोहित शर्मा (५) स्वस्तात बाद झाल्याने मुंबईची १३व्या षटकात ४ बाद १२१ धावा अशी घसरगुंडी उडाली. परंतु, हार्दिक पंड्या (३०) आणि केरॉन पोलार्ड (नाबाद ५०) यांनी जबरदस्त फटकेबाजी करुन पंजाबला दडपणाखाली ठेवले. या दोघांनी मॅट हेन्रीच्या षटकात २७ धावा वसूल करताना धावगती अवाक्यात आणली. परंतु, हार्दिक बाद झाल्यानंतर पंजाबने पुनरागमन केले. पोलार्डने एकाकी झुंज देताना अपयशी प्रयत्न केले. अखेरच्या षटकात मुंबईला १६ धावांची आवश्यकता मोहित शर्माने टीच्चून मारा करत पोलार्डला जखडवून ठेवले. तत्पूर्वी, मुंबईकरांच्या सुमार माºयाचा फायदा घेत पंजाबने २० षटकात ३ बाद २३० धावांचा एव्हरेस्ट उभारला . पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतु, पंजाबच्या मार्टिन गुप्टील - वृद्धिमान साहा या सलामीवीरांनी मुंबईच्या वेगवान गोलंदाजांकडून झालेल्या अनियंत्रित माºयाचा फायदा घेत दहाहून अधिकच्या सरासरीने धावा फटकावल्या. साहाने ५५ चेंडूत ११ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ९३ धावांचा तडाखा दिला. कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने त्याला चांगली साथ देताना २१ चेंडूत ४७ धावा फटकावल्या. या दोघांनी संघाच्या मजबूत धावसंख्येत मोलाचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक : किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकात ३ बाद २३० धावा (वृद्धिमान साहा ९३, ग्लेन मॅक्सवेल ४७; जसप्रीत बुमराह १/२४,कर्ण शर्मा १/३२) वि.वि. मुंबई इंडियन्स (लेंडल सिमन्स ५९, केरॉन पोलार्ड नाबाद ५०; मोहित शर्मा २/५७)

Web Title: Mumbai's slump defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.