रणजीमध्ये मुंबईच ‘ठाकूर’

By admin | Published: February 27, 2016 04:04 AM2016-02-27T04:04:42+5:302016-02-27T05:10:32+5:30

शार्दूल ठाकूर (३ व ५ बळी), धवल कुलकर्णी (५ व २ बळी) यांची भेदक गोलंदाजी, श्रेयस अय्यरची शानदार शतकी खेळी

Mumbai's 'Thakur' in Ranji | रणजीमध्ये मुंबईच ‘ठाकूर’

रणजीमध्ये मुंबईच ‘ठाकूर’

Next

पुणे : शार्दूल ठाकूर (३ व ५ बळी), धवल कुलकर्णी (५ व २ बळी)
यांची भेदक गोलंदाजी, श्रेयस अय्यरची शानदार शतकी खेळी व सिद्धांत ठाकूरच्या उपयुक्त फलंदाजीच्या बळावर मुंबईने सौराष्ट्राला १ डाव व २१ धावांनी नमवित ४१व्यांदा रणजी चषकावर मोहर उमटविली.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील मैदानावर हा सामना झाला. सौराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या २३५ धावांना प्रत्युत्तर देताना मुंबईने पहिल्या डावात ३७१ धावांची खेळी केली. पहिल्या डावात १३६ धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी सौराष्ट्राचा दुसरा डाव ११५ धावांत गुंडाळत एक डाव २१ धावांनी शानदार विजय मिळविला. शार्दूल ठाकूरने २६ धावांत ५ गडी तंबूत धाडत सौराष्ट्राची फलंदाजी मोडून काढली. धवल कुलकर्णीने ३४ धावांत २, बलविंदरसिंग संधूने २१ धावांत २, तर नायरने २६ धावांत १ बळी घेत सौराष्ट्राचा डाव गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला. चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक २७ धावा केल्या.
तत्पूर्वी मुंबईने कालच्या ८ बाद २६२ धावांवरून शुक्रवारी खेळण्यास सुरुवात केली. सिद्धेश लाडने कालच्या २२ धावांवरून खेळताना त्यात ८८ धावांची भर घातली. त्याने १०१ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांच्या साहाय्याने आपली खेळी साजरी केली. तर बलविंदर संधूने ६ चौकारांच्या साहाय्याने नाबाद ३४ धावा फटकाविल्या. लाड व संधू या जोडीने शेवटच्या गड्यासाठी केलेली १०३ धावांची भागीदारी निर्णायक ठरली. त्यांच्या खेळीमुळेच मुंबईने तिसऱ्या दिवशीच सामन्याचा निकाल लावला. (प्रतिनिधी)

धावफलक :
सौराष्ट्र पहिला डाव : ९३.२ षटकांत सर्व बाद २३५, (अर्पित वासवदा ७७, प्रेरक मंकड ६६. धवल कुलकर्णी ५/४२, शार्दूल ठाकूर ३/८९).
मुंबई पहिला डाव : ८२.२ षटकांत सर्वबाद ३७१, (श्रेयस अय्यर ११७, सूर्यकुमार यादव ४८, सिद्धेश लाड ८८. जयदेव उनादकट ४/११८, हार्दिक राठोड ३/७३).
सौराष्ट्र दुसरा डाव : ४८.२ षटकांत सर्व बाद ११५ (चेतेश्वर पुजारा २७, शेल्डन जॉक्सन १३. धवल कुलकर्णी २/३४, बलविंदर संधू २/२१, शार्दूल ठाकूर ५/२६).

०२कोटींचा
बोनस
आदित्य तारेच्या नेतृत्त्वाखालील रणजीविजेत्या मुंबई संघाला मुुंबई क्रिकेट असोशिएशनने दोन कोटी रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली. त्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदनही केले आहे.

Web Title: Mumbai's 'Thakur' in Ranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.