मुरली कुमारचा दबदबा

By admin | Published: March 26, 2015 02:04 AM2015-03-26T02:04:02+5:302015-03-26T02:04:02+5:30

भारतीय नौदलाचा बलाढ्य व आंतरराष्ट्रीय दर्जाचा शरीरसौष्ठवपटू मुरली कुमार याने एकहाती वर्चस्व राखताना गिरणगाव ‘श्री’ स्पर्धेचा किताबावर कब्जा केला.

Murali Kumar's Suppression | मुरली कुमारचा दबदबा

मुरली कुमारचा दबदबा

Next

मुंबई : भारतीय नौदलाचा बलाढ्य व आंतरराष्ट्रीय दर्जाचा शरीरसौष्ठवपटू मुरली कुमार याने एकहाती वर्चस्व राखताना गिरणगाव ‘श्री’ स्पर्धेचा किताबावर कब्जा केला. त्याचवेळी बोडीवर्क शॉपच्या अभिषेक खेडेकर याने अप्रतिम प्रदर्शन करताना ‘बेस्ट पोझर’ किताबवर नाव कोरले.
मुंबई बॉडीबिल्डींग असोसिएशन, ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि सबर्बन बॉडीबिल्डींग अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रळ येथील नरे पार्क मैदाना रंगलेल्या या स्पर्धेत एकूण ५० शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन केले. एकूण सहा वजनी गटात झालेल्या या
स्पर्धेत मुरली कुमार ८० किलो
वजनी गटातून सहभागी झाला
होता. या गटातून पाठारे जिमच्या
महेंद्र चव्हाण याने मुरलीला कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र अनुभवी मुरलीने आपल्या
अनुभवाच्या जोरावर बाजी मारुन गटविजेतेपदासह अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धा किताबाच्या अंतिम फेरीत त्याच्या समोर ७५ किलो व्जनी गटाच्या सुनील जाधवचे मुख्य आव्हान होते. मात्र यावेळी मुरलीने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखताना सुनीलला कोणतीही संधी न देता सहज बाजी मारली. दरम्यान तत्पुर्वी झालेल्या बेस्ट पोझरच्या लढतीमध्ये अभिषेक खेडेकरने अप्रतिम प्रदर्शन करताना प्रेक्षकांमध्ये धम्माल उडवून दिली. (क्रीडा प्रतिनिधी)

५५ किलो: १. नितीन शिगवण (वक्रतुंड जिम); २. किशोर कदम (परब फिट ); ३. सचिन लोखंडे (पाठारे जिम)
६० किलो: १. सुनील सपकाळ (आर. एम. भा . व्यायम शाळा); २. अरुण पाटील (जय भवानी व्यायाम शाळा); ३. सचिन पवार (बाल मित्र व्यायामशाळा ).

६५ किलो : विलास घडवले (बॉडी वर्क शॉप ); नितीन म्हात्रे (पॉवर झोन);प्रताप घोलप ((आर. एम. भा . व्यायम शाळा).
७० किलो : संतोष भरणकर (परब फिट); सुशील मुरकर (आर के एम जिम); सिद्धेश धनावडे (व्ही. फिटनेस).
७५ किलो : सुनील जाधव (माय फिटनेस); भास्कर कामळी (कीर्ती जिम); अब्दुल अन्सारी (पाठारे जिम)

Web Title: Murali Kumar's Suppression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.