मरेला नदालचे तर फेडररला जोकोविचचे आव्हान
By admin | Published: July 1, 2017 02:03 AM2017-07-01T02:03:07+5:302017-07-01T02:03:07+5:30
सध्याचा चॅम्पियन अॅण्डी मरे याला विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत दोन वेळेचा विजेता राफेल नदाल तसेच आठव्या जेतेपदासाठी झुंजणाऱ्या
लंडन : सध्याचा चॅम्पियन अॅण्डी मरे याला विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत दोन वेळेचा विजेता राफेल नदाल तसेच आठव्या जेतेपदासाठी झुंजणाऱ्या रॉजर फेडरर याला तीन वेळेचा विजेता नोवाक जोकोविच याचे आव्हान मिळू शकते.
अव्वल मानांकित मरेला सोमवारी नवख्या खेळाडूविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. जोकोविच स्लोव्हाकियाचा मार्टिन क्लिझानविरुद्ध खेळेल. त्याला तिसऱ्या फेरीत ज्युआन मार्टिन डेल पेट्रोचा सामना करावा लागू शकतो. तिसरा मानांकित फेडररची युक्रेनच्या खेळाडूशी सलामी होईल. फ्रेंच ओपन विजेता नदाल आॅस्ट्रेलियाचा जॉन मिलमॅनविरुद्ध खेळेल. मरे उपउपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सचा लुकास पाऊली याच्याविरुद्ध तर जोकोविच गेल मोनफिल्सविरुद्ध खेळेल. फेडररला ग्रिगोर दिमित्रोवविरुद्ध खेळावे लागणार आहे. नदालपुढे उप उपांत्यपूर्व फेरीत जाईल्स मुलेरविरुद्ध खेळण्याचे आव्हान असेल. अंतिम आठ खेळाडूंमध्ये तो दाखल झाल्यास नंतर निशिकोरी आणि मारिन सिलिचसारख्या दिग्गजांचे आव्हान असेल.
महिला गटात सध्याची विजेती सेरेना विलियम्स आणि माजी विजेती मारिया शारापोव्हा यंदा खेळणार नाहीत. मागची उपविजेती एंजलिक कर्बर ही सोडतीनुसार अंतिम आठ खेळाडूंत दाखल झाल्यास तिला स्वेतलाना कुझनेत्सोवाच्या आव्हानास सामोरे जावे लागू शकते.
दुसरी मानांकित सिमोन हालेपपुढे जोहाना कोंटा हिचे आव्हान असेल. कोंटाने श्ुक्रवारी जखमेमुळे ईस्टबर्न स्पर्धेचा उपांत्य सामना सोडून दिल्याने तिच्या सहभागाविषयी शंका आहे. कोंडा खेळल्यास तिला सलामीला सीह सु वेई हिच्याविरुद्ध झुंज द्यावी लागेल. याशिवाय कॅरोलिना पिलिसकोवा, कॅरोलिना व्होजनियाकी, इलिना स्वीतोलिना, डोमिनिका सिबुलकोवा, पाचवेळेची विजेती व्हिनस विलियम्स, व्हिक्टोरिया अझारेंका, सिसी बेलिस, दोनवेळेची विजेती पेट्रा क्वितोवा या प्रमुख खेळाडू देखील रिंगणात आहेत. (वृत्तसंस्था)
ऐतिहासिक कामगिरीसाठी फेडरर सज्ज
1जागितक क्रमवारीतील माजी दिग्गज स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यंदा विम्बल्डनमध्ये विक्रमी आठव्या जेतेपदासाठी सज्ज झाला आहे. आॅल इंग्लंड क्लब कोर्टवर स्पर्धेचे आयोजन ३ ते १६ जुलै दरम्यान होत आहे.
2फेडररने आॅस्ट्रेलियन ओपन जिंकून यंदाच्या मोसमाची शानदार सुरुवात केली. पण त्यानंतर तो क्ले कोर्टवरील फ्रेंच ओपनसह एकाही स्पर्धेत खेळला नाही. यामुळे विम्बल्डनसाठी फेडरर ताजातवाना असल्याचे मानले जात आहे. फ्रेंच ओपनच्या तुलनेत विम्बल्डन जिंकण्याची आपल्याकडे अधिक संधी असल्याची जाणीव ३५ वर्षांच्या फेडररला असावी. त्याने विम्बल्डन सातवेळा जिंकले असून फ्रेंच ओपनचे जेतेपद केवळ एकदा पटकविला आहे.
3फेडररने पुनरागमनातील पहिल्या स्पर्धेत स्टुटगार्ट ओपनमध्ये पहिल्याच फेरीत पराभवाचे तोंड पाहिले होते. ग्रासकोर्टवर भक्कम असलेला फेडरर म्हणाला,‘मानसिकदृष्ट्या ताजातवाना राहून मला विजेतेपदावर नाव कोरायचे आहे. मी दहा आठवडे विश्रांती घेतली. मी एखादा निर्णय घेतो त्यावेळी ठाम असतो. फ्रेंच ओपन न खेळल्याचा पश्चाताप नाही. ग्रासकोर्टवर पुरेसा सराव करण्याची संधी मिळाल्याने विम्बल्डनमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसह ऐतिहासिक जेतेपदावर मोहोर उमटविण्याचा निर्धार कायम आहे.’
3फेडररने पुनरागमनातील पहिल्या स्पर्धेत स्टुटगार्ट ओपनमध्ये पहिल्याच फेरीत पराभवाचे तोंड पाहिले होते. ग्रासकोर्टवर भक्कम असलेला फेडरर म्हणाला, ‘मानसिकदृष्ट्या ताजातवाना राहून मला विजेतेपदावर नाव कोरायचे आहे. मी दहा आठवडे विश्रांती घेतली. फ्रेंच ओपन न खेळल्याचा पश्चाताप नाही. विम्बल्डनमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसह ऐतिहासिक जेतेपदावर मोहोर उमटविण्याचा निर्धार कायम आहे.’