मुशर्रफी मुर्तझाचे निवृत्तीचे संकेत
By admin | Published: March 5, 2016 02:59 AM2016-03-05T02:59:09+5:302016-03-05T02:59:09+5:30
बांगलादेशचा कर्णधार मुशर्रफी मुर्तझा याने विश्वचषक टी-२० स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. कदाचित ही स्पर्धा आपली शेवटची स्पर्धा असेल, असे त्याने म्हटले आहे.
Next
मीरपूर : बांगलादेशचा कर्णधार मुशर्रफी मुर्तझा याने विश्वचषक टी-२० स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. कदाचित ही स्पर्धा आपली शेवटची स्पर्धा असेल, असे त्याने म्हटले आहे.
२०१७ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स चषक व २०१८ मध्ये होणाऱ्या विश्वचषक टी-२० स्पर्धेत खेळण्यासंदर्भात त्याला विचारले असता त्याने, आपण जास्त काळ संघाबरोबर असणार नाही, असे सांगितले. बांगलादेशच्या संघात १५ वर्षांहून अधिक काळ असलेला तो एकमेव खेळाडू आहे. त्यामुळे तो सर्वांसाठी मोठ्या भावासारखा आहे. शाकीब अल हसन, तमीम इकबाल, मुशफिकर रहीम यांच्याशीही त्याचे चांगले संबंध आहेत.