मुस्तफिजृूर, मलिंगाकडे नजरा
By Admin | Published: February 28, 2016 01:01 AM2016-02-28T01:01:56+5:302016-02-28T01:01:56+5:30
वेगवान गोलंदाजांमध्ये चढाओढ अनुभवणारी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक टी-२० रॉऊंड रॉबिन लढत आज रविवारी खेळली जाईल. या सामन्यात चाहत्यांच्या नजरा
मीरपूर : वेगवान गोलंदाजांमध्ये चढाओढ अनुभवणारी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक टी-२० रॉऊंड रॉबिन लढत आज रविवारी खेळली जाईल. या सामन्यात चाहत्यांच्या नजरा मुस्तफिजूर रहमान आणि लसिथ मलिंगा यांच्या कामगिरीकडे असतील. विजयी संघाची अंतिम सामन्यासाठी दावेदारी निश्चित होणार आहे.
बांगलादेशसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असेल. या संघाने दोन सामने खेळले आणि एक जिंकला. भारताने पहिल्या सामन्यात त्यांना पराभूत केले होते. दोन्ही संघांनी यूएईवर विजय मिळविला आहे. लंकेने १४ धावांनी आणि बांगलादेशने ५१ धावांनी विजय साजरा केला होता. दोन्ही संघ प्रभावी कामगिरी करण्यात मात्र अपयशी ठरले होते. लंकेने यूएईच्या अनुभवहीन माऱ्यापुढे केवळ १२९ तसेच बांगलादेशने १३३ धावांपर्यंतच मजल गाठली. आज होणारी लढत गोलंदाजांमधील युद्ध असेल. लंकेच्या गोलंदाजीचे नेतृत्व लसिथ मलिंगा स्वत: करेल. त्याने यूएईविरुद्ध चार बळी घेतले. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रहमान शानदार मारा करण्यात मात्र अपयशी ठरला; पण या संघातील अल अमीन, तस्किन अहमद व कर्णधार मुशर्रफ मूर्तझा हे तरबेज गोलंदाज आहेत. दुसरीकडे मलिंगासोबत नुआन कुलसेकरा, डावखुरा फिरकी गोलंदाज रंगना हेरथ आणि युवा गोलंदाज दुष्यंत चामीरा अधिक भेदक वाटतात. दोन्ही कर्णधारांना आपल्या फलंदाजांकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. बांगलादेशसाठी शब्बीर रहमान आणि मिथुन अली यांनी एका सामन्यात प्रभावी फलंदाजी केली. यूएईकडून महमदुल्लाह रियाद याने बऱ्यापैकी धावा केल्या आहेत. लंकेकडून दिनेश चांदीमल याने अर्धशतकी खेळी केली असून, दिलशानने २८ चेंडंूत २७ धावा केल्या होत्या. लंकेकडे टी-२०त खेळण्यासाठी चामरा कपूगेदरा हा उत्कृष्ट खेळाडू आहे. मलिंगा मात्र अष्टपैलू तिसारा परेरा याला संधी देण्याच्या मूडमध्ये आहे. (वृत्तसंस्था)