...तर माझे करियर संपूण जाईल : नरसिंग

By admin | Published: August 22, 2016 08:02 PM2016-08-22T20:02:52+5:302016-08-22T20:02:52+5:30

क्रीडा लवादाने लावलेल्या चार वर्षांच्या बंदीची समीक्षा न झाल्यास माझे करियर संपूण जाईल, अशी कबुली मल्ल नरसिंग यादव याने दिली.

... my career will be full: Narasing | ...तर माझे करियर संपूण जाईल : नरसिंग

...तर माझे करियर संपूण जाईल : नरसिंग

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ : क्रीडा लवादाने लावलेल्या चार वर्षांच्या बंदीची समीक्षा न झाल्यास माझे करियर संपूण जाईल, अशी कबुली मल्ल नरसिंग यादव याने दिली.  देश ७४ किलो प्रकारात आॅलिम्पिक पदकास मुकल्याचा दावा करीत नरसिंगने हे
प्रकरण तडीस नेण्याचे कळकळीचे आवाहन देखील केले. आज सकाळी येथे पोहोचल्यानंतर नरसिंग म्हणाला, माझ्या बंदीची समीक्षा न झाल्यास करियर संपुष्टात येईल. केवळ माझी प्रतिमा मलिन झाली असे नव्हे तर भारतीय क्रीडा क्षेत्रावर डाग लागला.

समीक्षा न झाल्यास एक निर्दोषव्यक्ती आयुष्यभर डागाळलेली प्रतिमा घेऊन जगेल. २७ वर्षांचा नरसिंग पुढे म्हणाला,ह्यमला खेळू दिले असते तर रिओत निश्चितच पदक जिंकलो असतो. रिओमध्ये ज्या तुकईरच्या मल्लाने कांस्य जिंकले त्याला मी मागच्यावर्षी लास वेगॉसमध्ये नमविले होते. राजकीय दडपणाखाली नरसिंगला नाडाने क्लीन चिट दिल्याचे काही लोकांनी वाडाला सांगितल्याचे मला कळले. माझ्या जवळचे माझ्याविरुद्ध कटकारस्थान करीत असतील, तर स्वत:ला निर्दोष सिद्ध करणे आणखीच कठीण होते.

सोनिपत पोलिसांनी तुझ्या तक्रारीवर अद्याप काही केले नाही मग स्वत:ला निर्दोष कसे सिद्ध करणार, असा सवाल करताच तो म्हणाला, सुशीलकुमारसोबत सराव करणारा ज्युनियर मल्ल जीतेश याने माझ्या एनर्जी ड्रिंकमध्ये २३ आणि २४ जून रोजी प्रतिबंधित औषध मिसळले असे मी तक्रारीत म्हटले होते. पण अद्याप कुणाला अटक झाली नाही. आता पंतप्रधानांकडे दाद मागणार आहे. सोनिपत पोलीस तपास करतील की नाही, याबद्दल मला आता शंका वाटू लागली. आता
सीबीआयनेच तपास करावा असा माझा आग्रह आहे.

Web Title: ... my career will be full: Narasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.