डॉन ब्रॅडमन यांच्याशी तुलना होणे हा माझा सन्मान - अश्विन
By admin | Published: February 18, 2017 03:12 PM2017-02-18T15:12:45+5:302017-02-18T15:12:45+5:30
आम्हाला अश्विनवर मात करावी लागेल. अश्विनच्या गोलंदाजीतली धार संपवण्याचा ऑस्ट्रेलियन संघाला विचार करावा लागेल.
Next
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 18 - सर डॉन ब्रॅडमॅन यांच्याशी तुलना होणे हा एक सन्मान आहे अशी प्रतिक्रिया ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने दिली. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टिव्ह वॉ यांनी काही दिवसांपूर्वी अश्विनची महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्याशी तुलना केली होती. अश्विनची आकडेवारी विलक्षण आहे. अश्विन हा गोलंदाजीमधला ब्रॅडमन आहे.
त्याची कामगिरी अविश्वसनीय आहे. आम्हाला अश्विनवर मात करावी लागेल. अश्विनच्या गोलंदाजीतली धार संपवण्याचा ऑस्ट्रेलियन संघाला विचार करावा लागेल. ऑस्ट्रेलियन संघ त्यामध्ये यशस्वी ठरला तर, आम्हाला विजयाची संधी आहे. सध्या ज्या पद्धतीने अश्विन खेळतोय. तो अनेक विश्वविक्रम मोडेल. त्याची आकडेवारी विलक्षण आहे. असे अश्विनच्या कामगिरीचे कौतुक करताना स्टीव्ह वॉ म्हणाला.
या कौतुकावर बोलताना अश्विन म्हणाला की, ब्रॅडमन यांच्याशी तुलना होणे सन्मान आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करीन. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघ लवकरच चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.