जळगावच्या नचिकेत ठाकूरची महाराष्ट्र संघात निवड क्रिकेट : एमसीएच्या १४ वर्षे आतील १५ सदस्य संघात समावेश

By admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:11+5:302017-01-23T20:13:11+5:30

जळगाव : बीसीसीआयच्या १४ वर्षे आतील गटातील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा क्रिकेट संघटनेचा खेळाडू नचिकेत ठाकूर याची महाराष्ट्र राज्य संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान राजकोट, गुजरात येथे आयोजित करण्यात आली आहे .

Nachiket Thakur of Jalgaon Selection Cricketer in Maharashtra team: 15 members in MCA's 14-member team included | जळगावच्या नचिकेत ठाकूरची महाराष्ट्र संघात निवड क्रिकेट : एमसीएच्या १४ वर्षे आतील १५ सदस्य संघात समावेश

जळगावच्या नचिकेत ठाकूरची महाराष्ट्र संघात निवड क्रिकेट : एमसीएच्या १४ वर्षे आतील १५ सदस्य संघात समावेश

Next
गाव : बीसीसीआयच्या १४ वर्षे आतील गटातील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा क्रिकेट संघटनेचा खेळाडू नचिकेत ठाकूर याची महाराष्ट्र राज्य संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान राजकोट, गुजरात येथे आयोजित करण्यात आली आहे .
नचिकेत ठाकूर हा काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचा ९ वीचा विद्यार्थी आहे. त्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या १४ वर्षे आतील आमंत्रित संघाच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलु कामगिरी केली होती. त्याने स्पर्धेच्या तीन सामन्यात दोन अर्धशतकांसह १६१ धावा केल्या. तर तीन सामन्यात १९ गडी बाद केले. त्याने एका सामन्यात १० पेक्षा जास्त गडी बाद करण्याचा पराक्रम केला. त्यासोबत एका सामन्यात त्याने पाच पेक्षा जास्त गडी बाद केले होते. अन्य सामन्यात त्याने डेक्कन जिमखाना, पुणे संघा विरोधातील सामन्यात एका डावात ६ धावा देत ८ गडी बाद केले.
त्याच्या या कामगिरीच्या जोरावर १४ वर्षे आतील महाराष्ट्र क्रिकेट संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.
त्याला प्रशिक्षक अविनाश आवारे आणि तन्वीर अहमद यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Nachiket Thakur of Jalgaon Selection Cricketer in Maharashtra team: 15 members in MCA's 14-member team included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.