नदाल उपांत्य फेरीत
By admin | Published: October 16, 2015 11:46 PM2015-10-16T23:46:15+5:302015-10-16T23:46:15+5:30
मास्टर्स टेनिस स्पर्धेत सातव्या मानांकित खेळाडू स्पेनच्या राफेल नदालने फॉर्ममध्ये परततानाच स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाला हरवले.
शांघाय : मास्टर्स टेनिस स्पर्धेत सातव्या मानांकित खेळाडू स्पेनच्या राफेल नदालने फॉर्ममध्ये परततानाच स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाला हरवले. आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
माजी क्रमांक एकचा खेळाडू नदालने वावरिंकाला ६३ मिनिटात ६-२, ६-१ असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी केल्यावर नदालने लागोपाठ ९ सेट जिकंत वावरिंकाला पराभूत केले.
वावरिंकाचा सामना या आधी मारिन सिलीच याच्याशी झाला होता. हा सामना तीन तास चालला. हा थकवा या सामन्यात वावरिंकाला जाणवत होता. नदालने या विजयाने फ्रेंच ओपनचा विजेता वावरिंकाच्या विरोधात आपला करियर रेकॉर्ड १३-२ पूर्ण केला.
नदालचा सामना सेमीफायनलमध्ये १६ व्या मानांकित फ्रान्सच्या जो विलफ्रेड सोंगासोबत होईल. सोंगा याने उपांत्यपूर्व
फेरीत दक्षीण अफ्रिकेच्या
केविन अँडरसन याला तीन सेटमध्ये
७-६,५-७, ६-४ असे पराभूत केले होते.(वृत्तसंस्था)