नदालच क्ले कोर्टचा बादशाह! दहाव्यांदा पटकावले फ्रेंच ओपनचे विजेतेपद
By admin | Published: June 11, 2017 09:25 PM2017-06-11T21:25:35+5:302017-06-11T21:54:20+5:30
क्ले कोर्टवरचा बादशाह म्हणजे राफाएल नदालच, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम
Next
>ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 11 - क्ले कोर्टवरचा बादशाह म्हणजे राफाएल नदालच, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत स्पेनच्या नदालने स्वित्झर्लंडच्या स्टॉनिस्लॉस वावरिंकाचा 6-2, 6-3, 6-1 असा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवला आणि विक्रमी दहाव्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. नदालचे हे कारकिर्दीतील एकूण 15 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे.
आज झालेल्या अंतिम लढतीत आपल्या लौकिकाला जागत नदालने जबरदस्त खेळ केला. त्याने सुरुवातीपासूनच या लढतीवर आपली हुकुमत गाजवली. त्याने पहिल्या सेटमध्ये वावरिंकावर वर्चस्व राखताना पहिला सेट 6-2 ने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही नदालचाच बोलबाला राहिला. त्याने हा सेटसुद्धा 6-3 अशा फरकाने आरामात खिशात घातला.
सलग दोन सेट जिंकल्यानंतर राफाने वावरिंकाला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. अखेर हा सेटसुद्धा 6-1 अशा दबदब्यासह जिंकत नदालने हा सामना 6-2, 6-3, 6-1 असा सरळ सेटमध्ये जिंकला आणि विजेतेपदावर कब्जा केला. याआधी नदालने 2005, 2006, 2007, 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2014 असे एकूण नऊ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. यंदाचे हे विजेतेपद नदालचे दहावे विजेतेपद ठरले आहे. त्याबरोबरच दहावेळा फ्रेंच ओपन जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू बनला आहे. तर महिला एकेरीमध्ये मार्गारेट कोर्ट यांनी 11 वेळा फ्रेंच ओपन जिंकण्याचा विक्रम केला होता.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य लढतींमध्ये वावरिंकाने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेचा पराभव केला.अंतिम फेरी गाठणारा तो गेल्या ४४ वर्षांतील सर्वांत प्रौढ खेळाडू ठरला. निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या या लढतीत वावरिंकाने मरेची झुंज ६-७, ६-३, ५-७, ७-६, ६-१ ने मोडून काढली.२०१५ च्या चॅम्पियनला आता ९ वेळचा विजेता राफेल नदाल आव्हानाला सामोरे जावे लागेल. स्पेनच्या राफेल नदालने दुसऱ्या उपांत्य लढतीत डोमिनिक थियेमचा ६-३,६-४,६-० ने पराभव केलो. दोन तास सात मिनिटेचाललेल्या या सामन्यात नदाल याने थीमवर वर्चस्व गाजवले. तिसऱ्या सेटमध्ये थियेमला एकही गुण मिळवता आला नाही.