नदालचे पहिल्याच फेरीत ‘पॅकअप’

By admin | Published: January 20, 2016 03:05 AM2016-01-20T03:05:27+5:302016-01-20T03:05:27+5:30

वर्षांतील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत मंगळवारी सर्वात मोठा धक्कादायक निकाल नोंदवल्या गेला. पुरुष एकेरीत पहिल्या फेरीत माजी नंबर वन खेळाडू स्पेनचा राफेल नदालला फर्नांडो

Nadal's first round of 'Pack Up' | नदालचे पहिल्याच फेरीत ‘पॅकअप’

नदालचे पहिल्याच फेरीत ‘पॅकअप’

Next

मेलबोर्न : वर्षांतील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत मंगळवारी सर्वात मोठा धक्कादायक निकाल नोंदवल्या गेला. पुरुष एकेरीत पहिल्या फेरीत माजी नंबर वन खेळाडू स्पेनचा राफेल नदालला फर्नांडो वरदास्कोने पहिल्या फेरीत गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. महिला एकेरीत आठव्या मानांकित अमेरिकेच्या व्हिनस विलियम्सनला जोहान्ना कोन्टा हिने पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही.
वरदास्कोने नदालचा संघर्षपूर्ण लढतीत ७-६, ४-६, ३-६, ७-६, ६-२ ने पराभव करीत धक्कादायक निकाल नोंदवला. २००९ च्या चॅम्पियन नदालला मेलबोर्न पार्कमध्ये प्रथमच पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला तर कारकिर्दीत ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत त्याला दुसऱ्यांदा पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला.
महिला विभागात माजी नंबर वन खेळाडू आणि आठवे मानांकन प्राप्त व्हिनस विलियम्सनला एकेरीच्या पहिल्या फेरीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. ब्रिटनच्या जोहाना कोंटाने व्हिनसचा ६-४, ६-२ ने पराभव केला. या पराभवामुळे व्हिनसचे आठवे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.
रॉड लेव्हर एरिनामध्ये मायदेशातील सहकारी खेळाडू पाचवे मानांकन प्राप्त नदाल आणि बिगरमानांकित वरदास्को यांच्यादरम्यानची लढत रंगतदार ठरली. निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या या लढतीत अखेरच्या सेटमध्ये वरदास्को ०-२ ने पिछाडीवर होता. त्यानंतर वरदास्कोने जोरकस फोरहँडच्या जोरावर दोनदा नदालची सर्व्हिस भेदत ५-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर वरदास्कोने तीनवेळच्या माजी विजेत्या नदालची सर्व्हिस भेदली आणि क्रॉस कोर्ट फटक्याच्या जोरावर विजयावर शिक्कामोर्तब केले.
आघाडीच्या खेळाडूंपैकी दुसऱ्या मानांकित ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेने जर्मनीच्या एल्केसांद्र जेवेरेव्हचा ६-१, ६-२, ६-३ ने पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मरेला दुसऱ्या फेरीत आॅस्ट्रेलियाच्या सॅम्युअल ग्रोधच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ग्रोधने फ्रान्सच्या एड्रियन मिनारियोचा ७-६, ६-४, ३-६, ६-३ ने पराभव केला तर १३ व्या मानांकित कॅनडाच्या राओनिकने लुकास पोइलीचा ६-१, ६-४, ६-४ ने पराभव केला.
पुरुष विभागातील अन्य सामन्यांत आठव्या मानांकित डेव्हिड फेररने जर्मनीच्या पीटर गोजोविकचा ६-४, ६-४, ६-२ ने, २३ व्या मानांकित फ्रान्सच्या गोएल मोफिल्सने जपानच्या युईचीचा ६-३, ७-६, ६-३ ने पराभव केला. राजीव रामविरुद्ध खेळताना दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केव्हिन अ‍ॅन्डरसनने दुखापतीमुळे माघार घेतली तर २० व्या मानांकित इटलीच्या फाबियो फोगनिनीने जाईल्स मुलरचा ७-६, ७-६, ६-७, ७-६ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)
महिला विभागात सर्वांत मोठा धक्कादायक निकाल माजी नंबर वन व्हिनस विलियम्सबाबत नोंदविला गेला. ब्रिटनच्या जोहान्ना कोन्टा हिने तिचे आव्हान संपुष्टात आणले. गेल्या वर्षी सेरेना विलियम्सविरुद्ध उपांत्य फेरीत पराभव स्वीकारणारी अमेरिकेची मॅडिसनने आपले १५ वे मानांकन योग्य ठरविताना कजाखिस्तानच्या जरिना डियासचा ७-६, ६-१ ने पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. १९ व्या मानांकित सर्बियाच्या येलेना यांकोव्हिचने पोलोना हेरकोगचा ६-३, ६-३ ने, ११ व्या मानांकित टिमिया बासिन्सकीने कॅटरिना सिनियाकोव्हाचा ६-३, ७-५ ने आणि २१ व्या मानांकित रशियाच्या एकातेरिना माकारोव्हाने मॅडिसन इंगलिसचा ६-३, ६-० ने पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आघाडीच्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या मानांकित गरबाइन मुगुरुजाने चमकदार सुरुवात करताना एस्टोनियाच्या एनेट कोंटावेटचा ६-०, ६-४ ने सहज पराभव केला. अन्य सामन्यांमध्ये २० व्या मानांकित सर्बियाच्या एना इव्हानोव्हिचने तामी पॅटरसनचा ६-२, ६-३ ने, नवव्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाने किम्बरली बिरेलीचा ६-२, ६-४ ने, १८ व्या मानांकित मलिना स्वीतोलिनाने व्हिक्टोरिया डुवालचा ६-२, ६-३ ने पराभव केला.महिला विभागात क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या हालेपला पात्रता फेरीचा अडथळा पार करणारी चीनची च्यांग शुवाईने पराभवाचा धक्का दिला. शुवाईने पंधराव्या प्रयत्नात प्रथमच ग्रॅण्डस्लॅम लढत जिंकली. शुवाईने या लढतीत ६-४, ६-३ ने सरशी साधली.

Web Title: Nadal's first round of 'Pack Up'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.