नदालची तुफानी घोडदौड

By admin | Published: May 27, 2016 03:55 AM2016-05-27T03:55:00+5:302016-05-27T03:55:00+5:30

क्ले कोर्टचा बादशाह व नऊ वेळचा विजेता स्पेनच्या राफेल नदालने अर्जेंटिनाच्या फाकुंडो बागनिसचा ३-० असा फडशा पाडून दिमाखात फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Nadal's tornado | नदालची तुफानी घोडदौड

नदालची तुफानी घोडदौड

Next

पॅरिस : क्ले कोर्टचा बादशाह व नऊ वेळचा विजेता स्पेनच्या राफेल नदालने अर्जेंटिनाच्या फाकुंडो बागनिसचा ३-० असा फडशा पाडून दिमाखात फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे नदालने यासह आपल्या कारकिर्दीतील २००वा ग्रँडस्लॅम विजय नोंदवला. दुसरीकडे अव्वल खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने फ्रेंच ओपनमधील ५०वा विजय मिळवून तिसरी फेरी गाठली.
ग्रँडस्लॅममध्ये २०० विजय मिळवणारा नदाल आठवा पुरुष खेळाडू ठरला. क्ले कोर्टवरील आपले वर्चस्व सिद्ध करताना नदालने बागनिस विरुद्ध ६-३, ६-०, ६-३ असा दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये नदालने एकही गेम न गमावता आघाडी घेतली. चमकदार सुरुवात केलेल्या बागनिसने पहिल्याच सेटमध्ये नदालची सर्विस भेदली. मात्र, यानंतर तो नदालविरुद्ध झगडताना दिसला.
त्याचवेळी, करियर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जोकोविचने बेल्जियमच्या स्टीव डार्सिसला ७-५, ६-३, ६-४ असे पराभूत करुन फ्रेंच ओपनमध्ये आपला ५०वा विजय मिळवला. जोकोचा पुढील फेरीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची तिसरी फेरी गाठलेल्या ब्रिटनच्या अलजाज बेडेने विरुद्ध लढत होईल.
अन्य लढतीत सातव्या मानांकीत थॉमस बेर्दिच (झेक प्रजासत्ताक) याने ट्यूनिशियाच्या मालेक जाजिरीचे आव्हान ६-१, २-६, ६-२, ६-४ असे परतावून तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. स्वित्झर्लंडच्या गतविजेत्या स्टेनिसलास वावरिंकाने जपानच्या टारो डॅनियलचा सरळ तीन सेटमध्ये ७-६, ६-३, ६-४ असा धुव्वा उडवला.
याआधी ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेला मात्र आगेकूच करण्यासाठी तब्बल ५ सेटपर्यंत झुंजावे लागले. १६४ व्या क्रमांकावर असलेल्या वाईल्ड कार्ड आधारे प्रवेश मिळविलेला स्थानिक खेळाडू मथायस बोर्ग्यू याने मरेला जबरदस्त झुंजवले. मात्र, मरेने अनुभवाच्या जोरावर मोक्याच्यावेळी खेळी उंचावताना ६-२, २-६, ४-६, ६-२, ६-३ असा संघर्षमय विजय मिळवला. आॅस्टे्रलियाचा १७व्या मानांकीत निक किर्गियोसने सहज आगेकूच करताना हॉलंडच्या इगोर सिसलिगचे आव्हान ६-३, ६-२, ६-१ असे संपुष्टात आणले. तर कॅनडच्या आठव्या मानांकित मिलोस राओनिकने एड्रियन मिनारिओला ६-१, ७-६, ६-१ असे नमविले. (वृत्तसंस्था)

Web Title: Nadal's tornado

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.