मालाडच्या एन.एल. महाविद्यालयाची बाजी

By admin | Published: November 13, 2016 02:18 AM2016-11-13T02:18:35+5:302016-11-13T02:18:35+5:30

मालाडच्या एन.एल. महाविद्यालय संघाने खालसा महाविद्यालय संघाचा ५०-४० असा पराभव करुन विभागीय क्रीडा कार्यालय (डिएसओ) आयोजित विभागीय व्हॉलीबॉल

Nal of Malad College betting | मालाडच्या एन.एल. महाविद्यालयाची बाजी

मालाडच्या एन.एल. महाविद्यालयाची बाजी

Next

मुंबई : मालाडच्या एन.एल. महाविद्यालय संघाने खालसा महाविद्यालय संघाचा ५०-४० असा पराभव करुन विभागीय क्रीडा कार्यालय (डिएसओ) आयोजित विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पुनर्नियोजित अंतिम सामन्यात बाजी मारली. एन.एल. संघ १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सांगलीला रवाना होणार आहे.
माटुंगा येथील पोदार मैदानावर विभागीय व्हॉलीबॉल अंतिम सामना खेळवण्यात आला. एन.एल. संघाने पहिल्या गेमपासून आक्रमक खेळ केला.
एन.एलच्या टी. ब्रीजेश, सी. जयदीप यांनी शानदार खेळ केला. रंगतदार झालेल्या पहिल्या गेममध्ये एन.एलने २५-२२
अशी बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये खालसा महाविद्यालयाच्या यश मोहाने आणि प्रणित देवकर
यांनी झुंज देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
अखेर सांघिक खेळाच्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर एन.एन. महाविद्यालयीन संघाने २५-१८ अशा फरकाने विजय मिळवला. (क्रीडा प्रतिनिधी)

आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एन.एल. संघ सांगलीला रवाना होणार आहे. दरम्यान, १९ आॅक्टोबर रोजी अंतिम सामना रद्द झाल्यानंतर शुक्रवारी हा सामना खेळवण्यात आला.
खेळाडंूमध्ये बाचाबाची झाल्याचे कारण देत डिएसओ तांत्रिक समितीने अंतिम सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये छापून
आल्यानंतर त्याचे अधिकृत पत्र संबंधित महाविद्यालयांना देण्यात आले होते.
सामन्यांसाठी ५ पंचासह क्रीडा विभाग अधिकारी सुभाष नवांदे उपस्थित होते.

Web Title: Nal of Malad College betting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.