बिंद्राचा सुवर्णावर नेम
By admin | Published: July 25, 2014 11:14 PM2014-07-25T23:14:57+5:302014-07-25T23:14:57+5:30
अभिनव बिंद्राने राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत शुक्रवारी 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत विक्रम नोंदवताना सुवर्णावर नेम साधला.
Next
ग्लास्गो : भारतीय नेमबाजीचा इतिहास सुवर्णाक्षरात लिहिणा:या अभिनव बिंद्राने राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत शुक्रवारी 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत विक्रम नोंदवताना सुवर्णावर नेम साधला. भारताचे या स्पर्धेत नेमबाजीमध्ये पहिले सुवर्णपदक आहे. एकूण भारताच्या खात्यावर तिस:या सुवर्णपदकाची नोंद झाली. भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता असलेल्या अभिनव बिंद्राने पात्रता फेरीसह अंतिम फेरीतही चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
चार वर्षापूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या या स्पर्धेत बिंद्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते तर दोन वर्षापूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याला अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविता आली नव्हती. बिंद्राने कारकिर्दीतील अखेरच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविण्याचे स्वप्न साकार केले. बिंद्राने बॅरी बडन शुटिंग रेंजमध्ये अंतिम फेरीत 2क्5.3 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाचा मान मिळविला. बांगला देशच्या अब्दुल्ला बाकी याला 2क्2.1 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तर इंग्लंडचा डॅनियर रिव्हर्स (182.4 गुण) कांस्यपदकाचा मानकरी ठरला. शूटऑपमध्ये पराभव स्वीकारणारा भारताचा रवी कुमार चौथ्या स्थानी राहिला.
पात्रता फेरीत बिंद्रा 622.2 गुणांसह तिस:या स्थानी होता. रिव्हर्स 623.6 गुणांसह अव्वल स्थानी तर इंग्लंडचाच के.पार 623.4 गुणांसह दुस:या स्थानी होता. रवी 62क्.6 गुणांसह चौथ्या तर बाकी 62क्.क् गुणांसह पाचव्या स्थानी होता.
बिंद्राचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या कारकीर्दीतील हे नववे पदक आहे. बिंद्राने स्पर्धेच्या एक दिवसापूर्वी ही त्याच्या कारकीर्दीतील अखेरची राष्ट्रकुल स्पर्धा असल्याचे जाहीर केले होते. (वृत्तसंस्था)
नेमबाजी
1क् मीटर एअर पिस्टल :
पुरुष : प्रकाश नंजप्पा, ओम प्रकाश (दु. 1.15 वा.)
महिला : अपूर्वी चंदेल, अयोनिका पाल (दु. 2.15 वा.)
ज्युदो ( राऊंड ऑफ 16)
9क् किलो गट :
अवतार सिंग वि. मॅथ्यू पुर्से
1क्क् किलो :
पथानिया वि. रेमंड
1क्क् किलो वरील :
पी. कुमार वि. अब्दुल रज्जाक
महिल :
78 किलो : जेडी चोंगथम वि. अल पोर्तियोंडो (दु. 2.15 वा.)
78 किलो वरील : राजविंदर कौल वि. जो. डी. मेयर्स (दु. 2.15 वा.)
मुष्टियुध्द
लाईटवेल्टर वेट : (64 किलो.)
मनोज कुमार वि. एक. लेस. मोहोसे
मिडलवेट : (75 किलो.)
किलो : विजेंदर वि. अॅड्रयू कोमेता
हॉकी
भारत वि. स्कॉटलंड (रात्री 8.3क् वा)
देश सुवर्ण रौप्य कास्य
इंग्लड675
ऑस्ट्रेलिया547
स्कॉटलंड533
भारत342
कॅनडा212