नरेंद्र बत्रा यांच्याकडे आंतरराष्ट्रीय हॉकीची धुरा

By Admin | Published: November 13, 2016 02:35 AM2016-11-13T02:35:24+5:302016-11-13T02:35:24+5:30

काही दिवसांपूर्वीच भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाने एकापाठोपाठ एक आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत बाजी मारत देशवासीयांना दिवाळी भेट दिली होती. आता, यानंतर

Narendra Batra holds international hockey axle | नरेंद्र बत्रा यांच्याकडे आंतरराष्ट्रीय हॉकीची धुरा

नरेंद्र बत्रा यांच्याकडे आंतरराष्ट्रीय हॉकीची धुरा

googlenewsNext

दुबई : काही दिवसांपूर्वीच भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाने एकापाठोपाठ एक आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत बाजी मारत देशवासीयांना दिवाळी भेट दिली होती. आता, यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी विश्वाच्या निवडणुकीतही भारतीय उमेदवाराने बाजी मारत पुन्हा एकदा अभिमानाने तिरंगा फडकवला आहे. हॉकी इंडियाचे (एचआय) अध्यक्ष नरेंद्र ध्रुव बत्रा यांची आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या (एफआयएच) अध्यक्षपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या पदी निवड झालेले ते पहिले भारतीय तर ठरलेलेच आहेत, त्याचबरोबर पहिले आशियाईदेखील ठरले आहेत.
देशातील एक दिग्गज क्रीडा प्रशासक म्हणून ५९ वर्षीय बत्रा
यांची छबी आहे. शनिवारी
झालेल्या एफआयएचच्या ४५व्या काँग्रेसदरम्यान त्यांनी बहुमत मिळवत अध्यक्षपद मिळवले. एफआयएचया अध्यक्षपदासाठी त्यांच्यासमोर आयर्लंडच्या डेव्हीड बालबर्नी आणि आॅस्टे्रलियाच्या केन रीड यांचे कडवे आव्हान होते. परंतु, या दोघांवरही वर्चस्व राखताना बत्रा यांची निवड झाली.
या मतदानामध्ये एकूण ११८ मतांपैकी सर्वाधिक ६८ मते बत्रा यांच्या पारड्यात पडली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले बालबर्नी आणि रीड यांना अनुक्रमे २९ व १७ मतांवर समाधान मानावे लागले. एफआयएचचे १२ वे अध्यक्ष म्हणून बत्रा आंतरराष्ट्रीय हॉकीचे नेतृत्व करतील. दखल घेण्याची बाब म्हणजे अध्यक्षपदी विराजमान झालेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले असल्याने भारतासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली. अध्यक्षपदाची ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक प्रणालीने गुप्तपणे पार पडली.
या मतदानासाठी प्रत्येक राष्ट्रीय संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाला एक टॅबलेट,युनिक पासवर्ड देण्यात आले होते. यानुसार गुप्त मतदान झाले. मावळते अध्यक्ष लिएंड्रो नेग्रे यांनी निवडणुकीच्या निकालाची घोषणा केली. दरम्यान, बत्रा यांच्या विजयामुळे आंतरराष्ट्रीय हॉकीचे केंद्र आता युरोपऐवजी आशिया होणार असल्याने बत्रा यांचा विजय आशियाई देशांसाठी विशेष ठरला आहे.(वृत्तसंस्था)

एफआयएचचे अध्यक्षपद मिळणे माझ्यासाठी भावनात्मक आणि सन्मानजनक क्षण आहे. भौगोलिक सीमांच्या आधारे खेळाचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचे माझे प्रथम काम असेल. भारत - पाकिस्तान यांच्यामध्ये राजकीय तणाव असल्याबाबत कोणतीही शंका नाही आणि याकडे कोणी दुर्लक्षही करू शकत नाही. मात्र, भारत आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध कुठेही खेळावेच लागेल. तसेच शुक्रवारी भारत व पाकिस्तान संघटनांच्या प्रतिनिधींची भेट झाली आणि त्यावेळी जुन्या वादांवर तोडगा काढला आहे.
- नरेंद्र बत्रा,
अध्यक्ष - एफआयएच

Web Title: Narendra Batra holds international hockey axle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.