राष्ट्रकुलची यादी कमी करण्याचा निर्णय दुर्दैवी - नरिंदर बत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:47 AM2018-03-23T01:47:43+5:302018-03-23T01:47:43+5:30

गोल्ड कोस्टमध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय पथकातील अधिका-यांच्या यादीला कात्री लावणाºया क्रीडा मंत्रालयाच्या भूमिकेवर भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

Narinda Batra - The decision to reduce the list of Commonwealth Games | राष्ट्रकुलची यादी कमी करण्याचा निर्णय दुर्दैवी - नरिंदर बत्रा

राष्ट्रकुलची यादी कमी करण्याचा निर्णय दुर्दैवी - नरिंदर बत्रा

Next

नवी दिल्ली: गोल्ड कोस्टमध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय पथकातील अधिका-यांच्या यादीला कात्री लावणाºया क्रीडा मंत्रालयाच्या भूमिकेवर भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) तीव्र आक्षेप नोंदविला आहे. स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी काही अधिकाºयांना वगळण्यात येत असून स्पर्धेत भारताची कामगिरी खराब झाल्यास क्रीडा मंत्रालय आणि साईला जबाबदारी स्वीकारावी लागेल, असा इशारा आयओए प्रमुख नरिंदर बत्रा यांनी दिला.
४ ते १५ एप्रिल दरम्यान आयोजित या स्पर्धेसाठी आयओएने मंत्रालयाकडे २२२ खेळाडू तसेच कोचेस आणि व्यवस्थापकांसह ९५ अन्य अधिकाºयांची यादी मंजुरीसाठी पाठविली. वृत्तानुसार मंत्रालयाने यातील २१ नावांना कात्री लावली. त्यात काही प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांचा समावेश आहे. या नव्या घटनेनंतर आयओए आणि क्रीडा मंत्रालयात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. बत्रा यांनी मंत्रालयाच्या निर्णयावर टीका करीत हा निर्णय दुर्दैवी संबोधला. राष्टÑकुल पथकाला निरोप देण्याच्या सोहळ्यात बोलताना बत्रा म्हणाले,‘ २१ अधिकाºयांची नावे कमी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नियमांची माहिती नसलेले लोक असा निर्णय घेत आहेत. १५ दिवसांहून कमी कालावधी असताना असे प्रकार घडत आहेत.’ बत्रा यांनी इंचियोन आशियाडचे उदहारण दिले. त्यावेळी व्यवस्थापक नसल्याने सरिता देवीला विरोध नोंदविण्यासाठी एका पत्रकाराकडून उसने पैसे घ्यावे लागले होते. व्यवस्थापकांची भूमिका मोठी असली तरी मंत्रालयाचे अधिकारी मानण्यास तयार नाहीत.
आयओएने पोस्टमनच्या
भूमिकेत यादी सोपविली. त्यातून काही अधिकाºयांची नावे कमी करण्याचे दुर्दैवी प्रकार घडले. औषधांची माहिती ठेवणाºया फिजिशियनचे नाव देखील वगळण्यात आले आहे. यामुळे कुठलाही खेळाडू डोपिंगमध्ये अडकू शकतो. खोकला झाला म्हणून चुकीचे औषध घेतल्यास खेळाडूची कारकिर्द संपू शकते. ’ (वृत्तसंस्था)

त्यानंतरच विरोध करु...
जे २१ अतिरिक्त अधिकारी पथकासोबत जात आहेत ते स्वत:च्या व क्रीडा महासंघाच्या खर्चाने जात असल्याचा दावा बत्रा यांनी केला. दरम्यान आयओए सचिव राजीव मेहता यांनी मंत्रालयाकडून अधिकृत यादी मिळाल्यानंतरच विरोध दर्शवू अशी सावध भूमिका घेतली. यामागील कारण विचारु, असेही मेहता यांनी सांगितले.

Web Title: Narinda Batra - The decision to reduce the list of Commonwealth Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा