नरसिंग यादवच्या रुममध्ये घुसखोरी, जेवणात औषध मिसळणा-याची ओळख पटली
By admin | Published: July 27, 2016 07:32 AM2016-07-27T07:32:44+5:302016-07-27T11:38:07+5:30
कुस्तीपटू नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणा-याची ओळख पटली असल्याची माहिती मिळत आहे, पोलीस ठाण्यात तक्रार नोंद
Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 27 - कुस्तीपटू नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणा-याची ओळख पटली असल्याची माहिती मिळत आहे. ही व्यक्ती एका आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूचा भाऊ असून नरसिंग यादवच्या रुममध्ये घुसखोरी करुन जेवणात बंदी असलेलं औषध मिसळल्याचा आरोप करण्यात आला आहे. नरसिंगने याअगोदरही सोनिपत शिबिराच्या वेळी जेवणात किंवा फुड सप्लिमेंटमध्ये बंदी असलेले औषध मिसळण्यात आले असण्याची शक्यता व्यक्त केली होती.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ही व्यक्ती स्वत: 65 किलो वजनी गटातील कुस्तीपटू आहे. ही व्यक्ती दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअममध्ये प्रशिक्षण देतो तसंच साई (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया) सोनिपत सेंटरलाही नॅशनल कॅम्पदरम्यान येणे जाणे असते. नरसिंग यादव भारतीय संघासोबत बल्जेरियामध्ये असताना या व्यक्तीला नरसिंगच्या रुमबाहेर फिरताना पाहण्यात आलं होतं. नरसिंग यादवच्या गैरहजेरीत या व्यक्तीने के डी जाधव हॉस्टेलमध्ये नरसिंगच्या रुमची चावीदेखील मागितली होती. जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा ही पवनची रुम आहे ना ? असं सागंत दुर्लक्ष करुन निघून गेला.
भारतीय कुस्ती महासंघाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. तक्रार देण्यासाठी नरसिंग यादव स्वत: हजर होता. फूड सप्लिमेंट आणि पाण्यामध्ये काही लोकांनी भेसळ केल्याचा नरिसंग यादवला संशय असल्याची माहिती हरियाणा पोलिसांनी दिली आहे.
Yes I have identified the person who mixed banned substance in my food, have filed police complaint: Narsingh Yadav pic.twitter.com/ryuAAlEcnW
— ANI (@ANI_news) July 27, 2016
दरम्यान नरसिंग यादवचे रिओ ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले असून नरसिंगऐवजी परवीन राणाला संधी देण्यात आली आहे. नरसिंग व त्याच्यासह रूममध्ये असलेला संदीप यादव बंदी असलेले अॅनाबॉलिक स्टेरॉईड मिथाएंडिनोनसाठी पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतरच्या दिवशी भारतीय कुस्ती महासंघाने नरसिंगची पाठराखण करताना त्याला रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी केलेला हा कट असल्याचे म्हटले आहे.
डोपिंगमध्ये अडकलेल्या नरसिंगने आज या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, डोपिंगमध्ये दोषी आढळलेला मल्ल नरसिंग यादव याला रिओ आॅलिम्पिकला पाठविण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. स्वत:चा बचाव करण्याची त्याला पुरेपूर संधी दिली जाईल, असे क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सोमवारी स्पष्ट केले. सिंग यांनी सांगितले, की नरसिंगची तक्रार क्रीडा मंत्रालयाकडे पाठविण्यात आली आहे. सरकारने हे प्रकरणा गांभीर्याने घेतले असून त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मी विश्व कुस्ती महासंघ (फिला) आणि नाडा या संस्थांना या कटाबाबत माहिती दिली आहे. मी सातत्याने विश्व कुस्ती महासंघाच्या संपर्कात असून या प्रकरणातील घडामोडींबाबत त्यांना माहिती देत आहे.
Parveen Rana will replace Narsingh Yadav in the 74kg category #RioOlympicspic.twitter.com/U3QTeXYe6T
— ANI (@ANI_news) July 26, 2016