पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गायलेले राष्ट्रगीत अभिमानास्पद

By Admin | Published: January 25, 2016 02:24 AM2016-01-25T02:24:28+5:302016-01-25T02:25:57+5:30

दक्षिण आफ्रिकेत २००३ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राष्ट्रगीत गायल्याचा क्षण माझ्या कारकिर्दीतील अभिमानास्पद होता

The national anthem played in the match against Pakistan is proud | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गायलेले राष्ट्रगीत अभिमानास्पद

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गायलेले राष्ट्रगीत अभिमानास्पद

googlenewsNext

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत २००३ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राष्ट्रगीत गायल्याचा क्षण माझ्या कारकिर्दीतील अभिमानास्पद होता, असे भारतरत्न सचिन तेंडुलकर याने सांगितले. त्याचप्रमाणे मुंबईत २०११ मध्ये झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात हजारो क्रिकेटप्रेमींच्या उपस्थितीमध्ये गायलेले राष्ट्रगीत अविस्मरणीय होते, असेही सचिनने सांगितले.
रविवारी मुंबईत झालेल्या एका दिमाखदार कार्यक्रमात ‘द स्पोटर््स हिरोज’ या खेळाडूंच्या सहभागाने चित्रीत केलेले पहिलेवहिले
राष्ट्रगीत व्हिडिओचे सचिनच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यामध्ये सचिनसह, माजी क्रिकेटपटू लिटल मास्टर सुनील गावसकर, माजी हॉकीपटू धनराज पिल्ले, नेमबाज गगन नारंग, टेनिसपटू महेश भूपती व सानिया मिर्झा, माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया आणि कुस्तीपटू सुशीलकुमार यांचा सहभाग
आहे. माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने
या विशेष उपक्रमाची कल्पना साकारली गेली.
जेव्हा कधी राष्ट्रगीताचा विषय निघतो तेव्हा प्रत्येक जण त्या वेळी मनापासून बोलतो. खेळाडू म्हणून राष्ट्रगीत नेहमीच प्रत्येकाला
प्रेरित करीत असतो. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा सामना आणि २०११ चा विश्वचषक मुंबईतील अंतिम सामना याचप्रकारचा होता. या दोन्ही प्रसंगी स्टेडियममध्ये गायिलेल्या राष्ट्रगीताचा अनुभव वेगळाच आणि अविस्मरणीय होता, असे सचिन या वेळी म्हणाला. (क्रीडा प्रतिनिधी)
आज आपण देशात सुरक्षित राहून आपली स्वप्न पूर्ण करू शकतो ते केवळ सीमारेषेवर सदैव देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आपल्या सैनिकांमुळे. त्यामुळे त्यांच्या बलिदानाचा विसर पडता कामा नये. देशाच्या तिन्ही दलाच्या सैनिकांचे मी खूप आभार मानतो आणि या उपक्रमातून त्यांना सर्व भारतीयांकडून सलाम करतो.
- सचिन तेंडुलकर
या अनोख्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा अभिमान आहे. ही व्हिडिओ प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल. जेव्हा दुसऱ्या देशात आपले राष्ट्रगीत गायिले जाते तेव्हा त्या क्षणासारखा दुसरा आनंदाचा क्षण कोणताच नसतो.
- धनराज पिल्ले,
माजी हॉकीपटू
या मोहिमेचा खूप अभिमान आहे. ही व्हिडिओ प्रत्येकाच्या मनात देशभावना जागृत करेल. देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक ‘हिरो’ला ही एक मानवंदना आहे. खेळाडू म्हणून तिरंगा अभिमानाने फडकवण्याची जाणीव राष्ट्रगीतातून होते.
- सुनील गावसकर, माजी क्रिकेटपटू
पोडियमवर राष्ट्रगीताची धून ऐकत पदक स्वीकारणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि खेळाडू त्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत असतात. देशवासीयांचा पाठिंबा आणि राष्ट्रगीतातून मिळणारी प्रेरणा यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो.
- गगन नारंग, नेमबाज

Web Title: The national anthem played in the match against Pakistan is proud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.