माजी कुस्तीपटू विनेश फोगाटला 'नाडा'ची नोटीस! १४ दिवसांत उत्तर मागितलं; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 01:20 PM2024-09-26T13:20:38+5:302024-09-26T13:21:26+5:30

विनेश फोगाट हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत व्यग्र आहे.

National Anti Doping Agency has issued a notice to former wrestler Vinesh Phogat | माजी कुस्तीपटू विनेश फोगाटला 'नाडा'ची नोटीस! १४ दिवसांत उत्तर मागितलं; काय आहे प्रकरण?

माजी कुस्तीपटू विनेश फोगाटला 'नाडा'ची नोटीस! १४ दिवसांत उत्तर मागितलं; काय आहे प्रकरण?

vinesh phogat news : भारताची माजी कुस्तीपटू विनेश फोगाट हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत व्यग्र आहे. ती जुलाना या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर नशीब आजमावत आहे. अशातच राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) विनेशला तिच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती न दिल्याबद्दल नोटीस पाठवली आणि १४ दिवसांत उत्तर मागितले. खरे तर नाडाच्या (National Anti-Doping Agency) नोंदणीकृत चाचणी पूलमध्ये नोंदणी केलेल्या सर्व खेळाडूंना डोप चाचणीसाठी त्यांच्या उपलब्धतेबद्दल माहिती देणे आवश्यक आहे आणि या खेळाडूंमध्ये विनेशचाही समावेश आहे. जर एखादा खेळाडू माहिती दिलेल्या ठिकाणी नसल्यास ती माहिती खोटी ठरवली जाते. 

नाडाने आपल्या नोटीसमध्ये विनेशला सांगितले की, नऊ सप्टेंबर रोजी सोनीपतच्या खारखोडा गावात विनेश तिच्या घरी डोप चाचणीसाठी उपलब्ध नव्हती. त्यामुळे तिने तिचे राहण्याचे ठिकाण जाहीर न करण्याची चूक केली आहे. याप्रकरणी विनेशने १४ दिवसांत उत्तर देणे गरजेचे आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठूनही १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने पदक न मिळाल्याच्या निराशेनंतर विनेशने या खेळातून निवृत्ती जाहीर केली होती. विनेश आणि तिचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनिया अलीकडेच काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत. 

विनेशला एकतर नियमाचे उल्लंघन मान्य करावे लागेल किंवा ती त्या ठिकाणी सुमारे ६० मिनिटे उपस्थित असल्याचा पुरावा द्यावा लागेल. पण, घराची माहिती न देणे हे डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन नाही असे विनेश सांगू शकते. मात्र, जर एखाद्या खेळाडूने १२ महिन्यांत तीन वेळा स्थळ माहिती नियमांचे उल्लंघन केले तरच NADA त्याच्यावर शुल्क आकारू शकते. दरम्यान, विनेशने विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने जुलानाची जागा चर्चेत आहे. भाजप आणि आम आदमी पक्षाने देखील इथे तगडा उमेदवार दिला आहे. विनेश प्रचारात व्यग्र आहे. प्रचारादरम्यान विनेशने एक मोठा दावा करताना खेळाडूंसाठी खेळाडूच पॉलिसी तयार करतील असे तिने सांगितले होते. 

Web Title: National Anti Doping Agency has issued a notice to former wrestler Vinesh Phogat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.