राष्ट्रीय अॅथलेटिस्क स्पर्धेला आजपासून जळगावात सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 09:29 AM2018-10-29T09:29:09+5:302018-10-29T09:30:02+5:30
रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडीया आरपीएफ अॅथेलेटीक्स चॅम्पियनशीपचे आयोजन जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयममध्ये करण्यात आले आहे.
जळगाव : रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडीया आरपीएफ अॅथेलेटीक्स चॅम्पियनशीपचे आयोजन जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयममध्ये करण्यात आले आहे. जळगाव येथे २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धांमध्ये भारतीय रेल्वेतील एकूण १७ क्षेत्रीय कार्यालयांमधून अंदाजे ३५० ते ४०० खेळाडू भाग घेणार आहेत. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचा ऑल इंडीया अॅथेलेटीक पोलिस मीटमध्ये निवड करण्यात येणार आहे.
जळगाव-येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात २६ व्या ऑल इंडीया आरपीएफ अॅथेलेटीक चॅम्पीयनशीप स्पर्धांमध्ये २९, ३० व ३१ रोजी विविध क्रिडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. यात २९ रोजी सकाळी ७.३० ते ८ वाजेदरम्यान पुरुष व महिलांची लांब उडी स्पर्धा होणार असून सकाळी ८ ते १०.३० दरम्यान उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तर यानंतर ८०० मीटर पुरुष व महिला धावणे, १०० मीटर पुरुष महिला धावणे, २०० मीटर महिला धावणे, दुपारनंतर ४०० मीटर अडथळयांची शर्यतीची अंतीम फेरी, गोळाफेक महिला व पुरुष स्पर्धा, ४ बाय १०० मीटर रिले पुरुष व महिला, १५०० मीटर महिला व पुरुषांची धावणे स्पर्धा, उंच उडी स्पर्धांची अंतिम फेरी, ११० मीटर अडथळ्यांची शर्यत, गोळाफेक स्पर्धा, १५०० मीटर पुरुषांची धावण्याची शर्यत होणार आहे.
३० तारखेला सकाळच्या सुमारास १० हजार मीटर पुरुषांची धावण्याची अंतीम फेरी, ५ हजार मीटर महिलांची धावण्याची अंतीम फेरी, २० किलोमीटर पुरुषांची चालण्याची अंतीम फेरी, ट्रीपल जंप स्पर्धांची पुरुषांची अंतीम फेरी, भालापेâक महिला व पुरुषांची स्पर्धा, थाळीफेक स्पर्धा, ४०० मीटर धावण्याची अंतिम स्पर्धा, पोल वल्ट स्पर्धांची अंतीम पेâरी, गोळा पेâक स्पर्धांची अंतिम फेरी तसेच दुपार नंतर २०० मीटर, ३ हजार मीटर, भाला पेâक, ४ बाय १०० मीटर धावण्याच्या शर्यतींची अंतीम पेâरी होणार आहे. तसेच ३१ रोजी २१ किलोमीटर पुरुष व महिलांची रस्त्यावर चालण्याची स्पर्धा, २०० मीटर धावणे, लांब उंडी यांची अंतीम फेरी होणार आहे.