राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे, एस अपुर्वा यांना जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 04:26 PM2020-02-07T16:26:12+5:302020-02-07T16:26:32+5:30
पहिला सेट गमाहूनही विद्यमान विश्व् विजेता प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ) ने अंतिम सामन्यात एअर इंडिया च्या संदीप दिवे चा चुरशीच्या लढतीत १६-२५, २५-१०, २५-०७ असा पराभव केला.
पहिला सेट गमाहूनही विद्यमान विश्व् विजेता प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ) ने अंतिम सामन्यात एअर इंडिया च्या संदीप दिवे चा चुरशीच्या लढतीत १६-२५, २५-१०, २५-०७ असा पराभव केला. दुसरीकडे महिला एकेरी च्या अंतिम सामन्यात विद्यमान विश्व् विजेती व विद्यमान आंतरराष्ट्रीय फेडेरेशन कप विजेती एस अपुर्वा ( एल आय सी ) ने माजी विश्व विजेती रश्मी कुमारी ( पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड ) चा दोन सरळ सेट्स मध्ये दाटून पराभव केला . विशेष म्हणजे एस अपुर्वा ने स्पर्धेतील सर्व सामने दोन सरळ सेट्स मध्ये जिंकून क्रीडा प्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
पुरुष वयस्कर गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शब्बीर खान ने तामिळनाडूच्या सुरेंद्र बाबू चा १८-१४, २५-०० असा सहज पराभव करून आपल्या वर्चास्व्याची ग्वाहीच दिली. महिला वयस्कर गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शोभा कामत ने महाराष्ट्राच्याच माधुरी तायशेटे चा २५-०४, २५-१३ असा सहज पराभव करून आपल्या नावी ७व्या राष्ट्रीय अजिंक्यपदाची नोंद केली. जळगावच्या श्री शिव छत्रपती जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या ४८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेची सांगता झाली असून या स्पर्धेत एकूण ४१ व्हाईट स्लॅम्स व ८ ब्लॅक स्लॅम्स ची नोंद झाली .
अंतिम फेरीचे निकाल
- पुरुष एकेरी - प्रशांत मोरे ( RBI ) वि वि संदीप दिवे ( एअर इंडिया ) १६-२५, २५-१०, २५-०७
- महिला एकेरी - एस. अपुर्वा ( भारतीय आयुर्विमा महामंडळ ) वि वि रश्मी कुमारी ( पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड ) २५-११, २५-११
- वयस्कर पुरुष एकेरी - शब्बीर खान ( महाराष्ट्र ) वि वि सुरेंद्र बाबू ( तामिळनाडू ) १८-१४, २५-०
- वयस्कर महिला एकेरी - शोभा कामत (महाराष्ट्र) वि वि माधुरी तायशेटे (महाराष्ट्र) २५-०४, २५-१३