राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : साक्षी रहाटे, सौरभ पाटील यांच्याकडे महाराष्ट्राचे नेतृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 01:43 PM2019-02-14T13:43:12+5:302019-02-14T13:43:33+5:30
National Kabaddi Tournament: ४५व्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर करण्यात आले आहेत.
मुंबई : ४५व्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर करण्यात आले आहेत. मुंबई शहरच्या साक्षी रहाटेकडे कुमारी, तर कोल्हापूरच्या सौरभ पाटीलकडे कुमार गटाच्या संघाचे नेतृत्व करणार आहेत. कलकत्ता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात १५ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. मुलांच्या संघाचा सराव मुंबईतील संघटनेच्या कार्यालयात, तर मुलींचा सराव कर्नाळा स्पोर्ट्स- पनवेल येथे सुरू होता. मुलांच्या संघात कोल्हापूर, पुणे, ठाणे यांचे २-२खेळाडू, तर मुंबई, उपनगर, पालघर, परभणी, रत्नागिरी, बीड यांचा १-१ खेळाडू निवडला गेला आहे.
मुलींच्या संघात मुंबई शहर, सातारा यांचे २-२ खेळाडू, तर रायगड, अहमदनगर, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, ठाणे, उपनगर, परभणी यांचा १-१ खेळाडू निवडला गेला आहे. अंतिम १२-१२खेळाडूंची यादी राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने उपाध्यक्षा श्रीमती शकुंतला खटावकर (अर्जुन पुरस्कारप्राप्त) यांनी जाहीर केली.
महाराष्ट्राचे संघ
कुमार गट संघ - १) सौरभ पाटील (संघनायक) - कोल्हापूर, २) तेजस पाटील - कोल्हापूर, ३) असलम इनामदार - ठाणे, ४) राजू कथोरे (ठाणे), ५) राहुल सवर (पालघर), ६) पंकज मोहिते (मुंबई शहर), ७) शुभम शेळके (पुणे), ८) भरत करंगुटकर (मुंबई उपनगर), ९) युवराज शिंदे (परभणी), १०) तन्मय चव्हाण (पुणे), ११) ओंकार कुंभार (रत्नागिरी), १२) वैभव गर्जे (बीड). प्रशिक्षक:- आयुब पठाण - नांदेड, व्यवस्थापक:- लक्ष्मण गावंड - रायगड.
कुमारी गट संघ - १) साक्षी रहाटे (संघनायिका) - मुंबई शहर, २) सोनाली हेळवी - सातारा, ३) प्रतीक्षा तांडेल - मुंबई शहर, ४) तेजा सपकाळ - रायगड, ५) जया राऊत - अहमदनगर, ६) मृणाली टोणपे - कोल्हापूर, ७) वैष्णवी खळदकर - सातारा, ८) दिव्या सपकाळ - रत्नागिरी, ९) राधा मोरे - पुणे, १०) लक्ष्मी गायकवाड - ठाणे, ११) काजल खैरे - मुंबई उपनगर, १२) कोमल लगोटे - परभणी. प्रशिक्षिका :- वीणा शेलटकर(खवळे), - उपनगर, व्यवस्थापिका :- सारिका जगताप - नाशिक.