राष्ट्रीय खो खो स्पर्धा : महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 11:13 PM2019-10-03T23:13:39+5:302019-10-03T23:16:24+5:30
महाराष्ट्राच्या संघाने मध्यभारत संघाचा एक डाव व ९ गुणांनी पराभव केला.
मुंबई : अल्बर्ट एक्का खो खो स्टेडियम , रांची , झारखंड येथे चालू असलेल्या राष्टीय किशोर किशोरी अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या गतविजेत्या महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी च्या दोंन्ही संघानी आपापले सामने जिंकत आगेकूच केली.
आज झालेल्या किशोरी गटाच्या स्पर्धेत महाराष्ट्र या संघाने मध्यभारत या संघाचा (०२-११-००) ११-०२ असा एक डाव व ९ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रच्या दिपाली राठोडने १:३० मिनिटे संरक्षण केले. आक्रमणात चार गडी बाद केला. संध्या सुरवसे हिने ४:५० मिनिटे संरक्षण केले तर भाग्यश्री बढे हिने आक्रमणात तीन गडी बाद केले. मध्य भारत तर्फे एम सक्सेना हिने २:००, मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक गडी बाद करत चांगला खेळ केला.
आज झालेल्या किशोरी गटाच्या स्पर्धेत तामिळनाडू या संघाने दिल्ली या संघाचा (०९-०५-०६-०८) १५-१३ असा २ गुणांनी पराभव केला. तामिळनाडूच्या जी. एस. मिश्रा हिने ३:३० , १:२० मिनिटे संरक्षण केले. आक्रमणात एक गडी बाद केला. टी. नीनाथा हिने २:००, १:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक गडी बाद केला . तर दिक्षा हिने आक्रमणात चार गडी बाद केले. दिल्लीतर्फे नेहा हिने १:००, ०:५० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात पाच गडी बाद केले तर काजल हिने ३:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात दोन गडी बाद करत चांगला खेळ केला.
आज झालेल्या किशोरी गटाच्या स्पर्धेत ओडिसा या संघाने आन्ध्रप्रदेश या संघाचा (१६-०१-०३) १६-०४ असा एकतर्फी गुणांनी पराभव केला. ओडिसा कडून खेळताना अर्चना हिने ४:३० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात चार गडी बाद करून अष्टपैलू खेळ केला तर शुभश्री हिने नाबाद ३:०० मिनिटे संरक्षण केले आक्रमणात दोन गडी बाद केले. शिवानी हिने २:३० नाबाद मिनिटे संरक्षण करत आक्रमणात दोन गडी बाद केले. आन्ध्रप्रदेशतर्फे ए. हेमलता हिने नाबाद १:२० मिनिटे संरक्षण केले तर एस. फरिया हिने आक्रमणात दोन गडी बाद करत चांगली लढत दिली.
आज झालेल्या किशोर गटाच्या स्पर्धेत गुजरात या संघाने पाँडेचरी या संघाचा (११-११-१७-०४) २८-१५ असा तेरा गुणाने पराभव केला. गुजरात कडून परेश याने २:५०, नाबाद १:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणातसहा गडी बाद केले. तर विनेश याने २:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात सात गडी बाद केले. तर अजय याने आक्रमणात चार गडी बाद केले. तर पौंडेचरीतर्फे आर. इमाने याने १:२० , १:२० मनिटे संरक्षण करत आक्रमणात चार गडी मिळवत आपल्या खेळाची चमक दाखविली तर एम. मुगीइन याने आक्रमणात तीन गडी बाद करुन चांगली साथ दिली.
आज झालेल्या किशोर गटाच्या स्पर्धेत महाराष्ट्र या संघाने उत्तराखंड या संघाचा (१२-०२-०२) १२-०४ असा एक डाव व ८ गुणाने पराभव केला. महाराष्ट्र कडून रोशन कोळी याने २:४०, मिनिटे संरक्षण करत आक्रमणात पाच गडी बाद केले. तर नागेश वसावे याने १:४० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात चार गडी बाद केले, तर आयुष्य लाड याने २:२० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात दोन गडी बाद केले.