राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्र तृतीय स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 10:31 PM2019-05-28T22:31:27+5:302019-05-28T22:34:12+5:30

अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

in National lagori competition Maharashtra got third place | राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्र तृतीय स्थानी

राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्र तृतीय स्थानी

Next

मुंबई : लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने, दिल्ली लगोरी संघटनेच्या वतीने आठवी सिनियर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद  व एशियन निवड चाचणी स्पर्धा नुकतीच न्यु कृष्णा मॉडेल पब्लिक स्कुल,रावता व्हिलेज,नवी दिल्लीत येथे पार पडली. या स्पर्धेत १५ राज्य  सहभागी झाले होते. या स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

  स्पर्धेत पुरुषांच्या गटात दिल्ली संघाला विजेते पद, तर उपविजेतेपद पॉंडेचरी, तर तृतीय स्थान महाराष्ट्र व तेलंगणा संघाला मिळाले. महिलांमध्ये सुद्धा दिल्ली  संघाने सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपद मिळविले. उपविजेतेपद तामिळनाडू, तर तृतीय स्थान दिल्ली एन सी आर व चंदीगड संघाला मिळाले. टार्गेट लगोरी प्रकारात गोवा संघाला प्रथम, छत्तीसगड संघाला द्वितीय स्थान, तर मिक्स डबल मध्ये पॉण्डेचेरीने अजिंक्यपद मिळविले. या स्पर्धेतून निवडलेला संघ, थायलंड येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय लगोरी स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत. बक्षीस वितरण समारंभ आ. कंवलजीत सहरावत, दिल्ली मनपाचे नगरसेवक दीपक मेहरा,विनोद जैन, दिल्ली संघटनेचे अध्यक्ष मनोज कुमार, सचिव अविनाश साहू, प्राचार्य हवा सिंग,संदीप गुरव, तामिळनाडू लगोरी संघटनेचे सचिव कलावती अय्यानार, तांत्रिक मार्गदर्शक तुषार जाधव आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून भरत गुरव यांनी, तर सहपंच श्रीधर तरूपल्ला, राजू, धनंजय, अरुण, मित्तल, सोमवीर, राकेश, विटकर, सुधीर, तन्वेष वेणगुरकर, नितीन परसकर यांनी काम पाहिले. 

या राष्ट्रीय स्पर्धेतील महाराष्ट्राच्या विजयी खेळाडूंची नावे खालील प्रमाणे -- सिद्धांत संतोष गुरव, भूषण राऊत, दिवेश महाकाल, रोहन काळे, हेरंब गर्दे, कुणाल जाधव, रितेश पेणोरे, प्रियांशू खोडके, प्रशिक अंबाडे, अर्सलान सय्यद, स्वप्नील मालेवर, साईराज वीटकरे आणि प्रतीक बी. संघ प्रशिक्षक संजय.यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र लगोरी संघटनेचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: in National lagori competition Maharashtra got third place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.