शाळेत राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आवश्यक
By Admin | Published: March 5, 2017 04:01 AM2017-03-05T04:01:45+5:302017-03-05T04:01:45+5:30
सिनेस्टार आमिर खानच्या दंगल चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली महिला मल्ल बबिता फोगाट हिने देशात महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील
भोपाळ : सिनेस्टार आमिर खानच्या दंगल चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली महिला मल्ल बबिता फोगाट हिने देशात महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील शाळांमध्ये राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गाव व शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांच्या जीवनाला सुरुवात होत असते, असे बबिताने म्हटले आहे.
‘दंगल’ चित्रपट बबिता फोगाटच्या जीवनावर आधारित आहे. बबिता म्हणाली, ‘‘महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी गाव व शालेय पातळीवर राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करूण देणे आवश्यक आहे. कुस्तीचा स्पर्धात्मक माहोल निर्माण केला, तर या खेळात चांगले निकाल मिळू शकतात. जर कुठल्या संस्थेची किंवा सरकारची मदत मिळाली, तर कुस्ती अकादमी सुरू करण्याची इच्छा आहे.’’
महिला कुस्तीमध्ये पूर्वीच्या तुलनेत आता बरीच सुधारणा झाली आहे. सुरुवातीला भारतात महिला मल्ल नव्हत्या. महिला कुस्तीमध्ये प्रशिक्षकांची उणीव नाही, असेही तिने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. दंगल चित्रपटामुळे महिला कुस्तीबाबत लोकांची धारणा बदलली. लोकांना यामध्ये आवड निर्माण झाली.
अनेक लोक आपल्या मुलींना
माझ्या बाबांच्या आखाड्यामध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल करतात; पण आमच्याकडे पुरेशा सुविधा नाहीत.’’ (वृत्तसंस्था)
चाहत्यांच्या प्रेमामुळेच येथवर पोहोचलो
दंगल हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खासगी जीवनावर बराच प्रभाव पडला. त्यामुळे जीवनात आमूलाग्र बदल झाला. चाहत्यांच्या प्रेमाचा आम्ही अव्हेर करू शकत नाही. चाहत्यांमुळेच आम्ही येथवर पोहोचलो आहोत, हे विसरता येणार नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे खेळाडू म्हणून आमच्यावर कुठलेही दडपण आलेले नाही. पदक पटकावणे आमच्या हातात नसते. मेहनत घेण्यासाठी व चांगली कामगिरी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. उणिवा असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. -बबिता फोगाट