कोरोनामुळे राष्ट्रीय जलतरणपटूचा मृत्यू, कुटुंबीयांचा हॉस्पिटलवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 06:30 PM2020-06-22T18:30:36+5:302020-06-22T18:31:22+5:30
फेब्रुवारीमध्येच त्याचा विवाह झाला होता...
दिल्ली प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कोरोनामुळे राष्ट्रीय जलतरणपटू आशुतोष याचे निधन झाले, परंतु त्याच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करताना गंभीर आरोप केले. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही 4 लाख 26,910 इतकी झाली आहे. त्यापैकी 3 लाख 44,416 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यात दिल्ली सरकारवर सातत्यानं टीका होत आहे. राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूच्या निधनामुळे पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटले आहे.
हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार मिळाले नाही आणि डॉक्टरांकडून दुर्लक्ष झाल्याने 26 वर्षीय आशुतोषचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. 17 जूनला लेडी हार्डींग हॉस्पिटलमध्ये आशुतोषचा मृत्यू झाला. आशुतोषच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या कामकाजावर आरोप केले. शिवाय आशुतोषचा मृतदेह देतानाही प्रशासनाकडून गैरवर्तवणूक करण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला.
कुटुंबीयांनी काय दावा केला?
10 जूनला आशुतोषची प्रकृती अचानक खालावली आणि त्याला लेडी हार्डींग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्याची प्राथमिक चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर डॉक्टरांनी, इथे पलंग अडवून ठेऊ शकत नाही, तुम्ही त्याला घरीच क्वारंटाईन करा, असे सांगितले. कुटुंबीयानीही त्याला घरी नेले आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं त्याला दिली. पण, आशुतोषच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होताना दिसत नव्हती. चार दिवसानंतर त्याच्या वैद्यकिय अहवालासाठी कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये गेले, परंतु त्याचा अहवाल हरवल्याचे सांगण्यात आले.
कुटुंबीयांनी खासगी चाचणी केंद्रात पुन्हा टेस्ट करून घेतली आणि त्यात त्याला कोरोना झाल्याचे समोर आले. तोपर्यंत आशुतोषची प्रकृती आणखी खालावली होती. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आणि 17 जूनला त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्येही डॉक्टरही त्याला पाहायला आले नाहीत आणि तेथे योग्य सुविधाही नव्हती, असे कुटुंबीयांनी सांगितले.
आशुतोष त्याच्या कुटुंबीयांसह करोल बाग येथे भाड्याच्या घरात राहत होता आणि फेब्रुवारीमध्येच त्याचा विवाह झाला होता. 19 जूनला त्याचा वाढदिवस होता. दिल्लीकडून तो जलतरण स्पर्धेत सहभाग घ्यायचा. त्याच्या जाण्यानं कुटुंबीयांना पुढील आयुष्य काढायचे कसे, ही चिंता सतावत आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
गौतम गंभीरकडून MS Dhoniचं कौतुक; विराट कोहलीच्या पाठीशी ठाम उभा राहिला नसता तर...
WWE सुपरस्टार 'अंडरटेकर' निवृत्त; त्याचं खरं नाव तुम्हाला माहित्येय?
७५० विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचं निधन; सचिन तेंडुलकरनं वाहिली श्रद्धांजली
Fact Check : पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद इरफानचा मृत्यू? पीसीबीच्या ट्विटनंतर चर्चेला उधाण
विराट कोहलीच्या नवीन घड्याळाची किंमत एवढी की निघेल पाकिस्तानी क्रिकेपटूचा दीड महिन्याचा पगार
The Undertaker Retirement : अंडरटेकर अन् केन यांच्यात खरंच होतं का रक्ताचं नातं?
The Undertaker Retirement : या आलिशान घरात राहणाऱ्या अंडरटेकरची संपत्ती कितीय माहित्येय?
OMG : गाडीचा चुराडा झाला; आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू थोडक्यात वाचला