मुंबईत रंगणार राष्ट्रीय रग्बीचा थरार

By admin | Published: October 18, 2016 06:16 AM2016-10-18T06:16:11+5:302016-10-18T06:16:11+5:30

येथे २० व २१ आॅक्टोबर दरम्यान राष्ट्रीय ज्यूनिअर रग्बीचा थरार रंगणार

National Rugby throws in Mumbai | मुंबईत रंगणार राष्ट्रीय रग्बीचा थरार

मुंबईत रंगणार राष्ट्रीय रग्बीचा थरार

Next


मुंबई : येथे २० व २१ आॅक्टोबर दरम्यान राष्ट्रीय ज्यूनिअर रग्बीचा थरार रंगणार असून १८ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या गटात होणाऱ्या या स्पर्धेची सोमवारी मुंबईत घोषणा करण्यात आली. बॉम्बे जिमखाना येथे होणाऱ्या या सामन्यात मुलांच्या गटात १८ संघांचा समावेश असून मुलींच्या गटात १२ संघांचा सहभाग आहे. दोन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेचे सामने साखळी आणि बाद फेरीने खेळविण्यात येतील.
विशेष म्हणजे, गतवर्षी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत एकूण १३ संघांचा समावेश होता. यंदा मात्र सहभागी संघांची संख्या वाढली आहे. मुलांच्या गटात पश्चिम बंगाल तर मुलींच्या गटात ओडिसा संघ विजेतेपद राखण्याच्या निर्धाराने खेळतील. त्याचवेळी यजमान महाराष्ट्राला गतवर्षी मुलांच्या गटात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र यजमानांनी विजेतेपदाचा निर्धार केला आहे.
महाराष्ट्राच्या संघात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, गोंदिया, सातारा आणि कोल्हापूर येथील खेळाडूंचा समावेश आहे. तसेच मुलांच्या संघात अमय पोद्दार, शेहबाझ कपूर आणि ईश्वर राठोड या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असून मुलींच्या संघात भारताची अव्वल खेळाडू रुची शेट्टीचा समावेश आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
>स्पर्धेत सहभागी संघ :
मुले : महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, तामिळनाडू, दमण, उत्तराखंड, ओरिसा, हरियाणा, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, जम्मू - काश्मिर, छत्तिसगड, बिहार, राजस्थान
आणि आंध्र प्रदेश.
मुली : महाराष्ट्र, ओरिसा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, जम्मू - काश्मिर, बिहार, दिल्ली, राजस्थान, केरळ आणि आंध्र प्रदेश.

Web Title: National Rugby throws in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.