राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : राहुल आवारे, उत्कर्ष काळे यांना सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 02:47 AM2017-11-19T02:47:07+5:302017-11-19T02:47:19+5:30
महाराष्ट्राच्या राहुल आवारे, उत्कर्ष काळे यांनी राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून, सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. कौतुक ढाफळे, विक्रम कु-हाडे यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
पुणे : महाराष्ट्राच्या राहुल आवारे, उत्कर्ष काळे यांनी राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून, सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. कौतुक ढाफळे, विक्रम कुºहाडे यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय कुस्ती महासंघांतर्गत इंदोर येथे झालेल्या या स्पर्धेत फ्री स्टाईल प्रकारात राहुल आवारेने ६१ किलो वजन गटात हरियानाच्या सरवणला, तर ५७ किलो वजन गटात महाराष्ट्राच्या उत्कर्ष काळेने दिल्लीच्या प्रवीण कुमारला नमवून सुवर्ण पदक जिंकले.
ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्राच्या विक्रम कुºहाडेला ६० किलो गटात आणि फ्री स्टाईल प्रकारात ७९ किलो गटात कौतुक ढापळेलासुद्धा कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
शनिवारी शेवटच्या दिवशी फ्री स्टाईल प्रकारात अमिंत धनकड (७० किलो गट) आणि मौसम खत्री (९७ किलो गट) यांनी अनुक्रमे अरुण कुमार आणि रुबेलजित यांना नमवित सुवर्ण पदक जिंकले. या स्पर्धेत हरियाना संघाने पुरुष, महिला आणि ग्रीको रोमन प्रकारात अव्वल स्थान संपादन केले.