'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' बॅडमिंटन स्पर्धेत ४८७ बॅडमिंटनपटूंचा सहभाग

By नारायण जाधव | Published: August 6, 2022 07:42 PM2022-08-06T19:42:08+5:302022-08-06T19:42:43+5:30

११, १३, १५ वर्षांखालील मुले, मुली तसेच खुला गट पुरूष, महिला अशा गटांमध्ये झाली स्पर्धा

Navi Mumbai  487 badminton players participated in Independence Day special Tournament | 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' बॅडमिंटन स्पर्धेत ४८७ बॅडमिंटनपटूंचा सहभाग

'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' बॅडमिंटन स्पर्धेत ४८७ बॅडमिंटनपटूंचा सहभाग

Next

नारायण जाधव, नवी मुंबई: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम विभागाच्या वतीने ‘अमृत महोत्सव बॅडमिंटन स्पर्धेचे; आयोजन ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन यांचे सहयोगाने 3 ते 5 ऑगस्ट 2022 या कालावधीत ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन येथील बॅडमिंटन कोर्टवर करण्यात आले होते.. या स्पर्धेला बॅडमिंटनपटूंचा उत्फुर्त सहभाग लाभला असून 11, 13, 15 वर्षाखालील मुले व मुली तसेच खुला गट पुरुष व महिला अशा 487 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला.

स्पर्धेचा शुभारंभ 3 ऑगस्ट 2022 रोजी उपआयुक्त श्री.मनोजकुमार महाले यांच्या शुभहस्ते, ऐरोली विभाग अधिकारी महेंद्र सप्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व अभिलाषा म्हात्रे तसेच ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव डॉ. हेमंत. अनार्थे व विश्वस्त श्री.प्रविण पैठणकर, स्पोर्ट्स कमिटी प्रमुख तसेच इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संपूर्ण देशात साज-या होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नवी मुंबईकर नागरिक देखील उत्साहाने सहभागी झाले असून शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता ‘अमृत महोत्सव बॅडमिंटन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षांच्या कालावधीत कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीमुळे आयोजित करता न येऊ शकलेल्या स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साह दिसून आला.

स्पर्धेतील अंतिम विजेते

11 वर्षातील मुले- प्रथम -रेवंत शृंगारपुरे, व्दितीय- आरव महेश्वर, तृतीय-पुर्वन कतक, चतुर्थ-ज्ञानेश पाटील

11 वर्षातील मुली- प्रथम- अक्षरा जाधव, व्दितीय -गीत नखरे, तृतीय -तनया औटी, चतुर्थ- रक्षा राठोड

13 वर्षातील मुले- प्रथम -मयुरेश भुतकी, व्दितीय -शौर्य कौशिक, तृतीय -वेदांग मिश्रा,चतुर्थ- अभय बिस्ट

13 वर्षातील मुली- प्रथम - श्वेतलाना मुखर्जी, व्दितीय-आर्या अय्यर, तृतीय -प्राक्षी जैन, चतुर्थ-तिशा श्रीवास्तव

15 वर्षातील मुले- प्रथम -रुजल वदाते, व्दितीय -वितरग शुक्ला, तृतीय -अर्णव पाटील, चतुर्थ- तनुश अढव

15 वर्षातील मुली- प्रथम-मनस्वी गौडा, व्दितीय -ज्वोहाना सिबी, तृतीय -आशिता रॉय, चतुर्थ-रेहा शहा

खुला गट महिला- प्रथम -अलका करायली, व्दितीय - मृदुला डाके, तृतीय- बितीका रॉय, चतुर्थ - नंदिनी शर्मा

खुला गट पुरुष- प्रथम- जिन्नांश जैन, व्दितीय -सौरव साळवी, तृतीय - अर्णव भोसले, चतुर्थ- संदिप पाटील

स्पर्धेतील विजयी खेळाडूंना क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त सोमनाथ पोटरे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व अभिलाषा म्हात्रे तसेच ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय डोके,सचिव डॉ.हेमंत अनार्थे, सह सचिव तथा स्पोर्ट्स कमिटी प्रमुख प्रविण पैठणकर, कमिटी सदस्य अनंता कामत, जगदिश नायक, मोहन शेट्टी, मोहन सोमवंशी, अनुराग श्रीवास्तव, शिवा सर यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानीत करण्यात आले. कोरोनामुळे दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या अमृत महोत्सव बॅडमिंटन स्पर्धेस सर्व वयोगटातील  बॅडमिंटन खेळाडूंचा अत्यंत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: Navi Mumbai  487 badminton players participated in Independence Day special Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.