नेव्ही मॅरेथॉन; अनुभवी ज्ञानेश्वर मोरघा याचे जेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:13 AM2017-11-20T01:13:38+5:302017-11-20T01:13:41+5:30
मुंबई : ऐन थंडीत मुंबईकरांच्या तुफानी प्रतिसादात अर्ध मॅरेथॉन रविवारी उत्साहात पार पडली.
मुंबई : ऐन थंडीत मुंबईकरांच्या तुफानी प्रतिसादात अर्ध मॅरेथॉन रविवारी उत्साहात पार पडली. वांद्रे-कुर्ला संकूल येथे झालेल्या मॅरेथॉनमध्ये ज्ञानेश्वर मोराघा याने १ तास ०९ मिनिटे ४२ सेकंद अशी वेळ नोंदवत २१ किमी पुरुष गटात आपले वर्चस्व राखले. महिला गटात लिलाम्मा अल्फान्सो हिने १ तास ४२ मिनिटे ५६ सेकंद वेळ नोंदवत पहिल्या क्रमाकांला गवसणी घातली. या मॅरेथॉनमध्ये सुमारे १० हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी नौदलातील अधिकारी-कर्मचारी कु टूंबियांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
नौदल दिनाचे औचित्य साधत भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागातर्फे आणि साई इस्टेट कन्सल्टंट्सच्या मदतीने अर्ध मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. यंदा मॅरेथॉनचे दुसरे पर्व होते. १० आणि २१ किलोमीटर मॅरेथॉन पुर्ण करणाºया प्रत्येक स्पर्धकाला नौदलाकडून पदक देण्यात आले.
पुरूष गटात दुसºया स्थानी मनोहर तांबे याने झेप घेतली. महिला गटात क्रांती साळवी हीने दुसरा क्रमांक पटकावला. १० किलोमीटर अर्धमॅरेथॉनच्या पुरूष गटात दिनेश मौर्या (३२ मिनिटे ४३ सेकंद) आणि महिला गटात कविता भोईर (४२मिनिटे ३१सेकंद) यांनी विजय मिळवला. ५५ वर्षांवरील ज्येष्ठांची २१ किलोमीटर मॅरेथॉन संपूर्ण अर्ध मॅरेथॉनमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. यात पांडुरंग चौगुले यांनी १ तास २८ मिनिटे ४३ सेकंद अशी वेळ नोंदवत लक्ष वेधले.
प्र्रविण गायकवाड यांना दुसºया स्थानावर समाधान मानावे लागले. या मॅरेथॉनमध्ये दोन हजार नौदल अधिकारी आणि त्यांच्या कुटूंबिय यांचाही समावेश होता.