नयन चॅटर्जीने फडकवला तिरंगा

By admin | Published: June 6, 2016 02:28 AM2016-06-06T02:28:50+5:302016-06-06T02:28:50+5:30

गेल्याच आठवड्यात मलेशिया येथे झालेल्या आशिया रोटॅक्स मॅक्स चॅलेंज कार्टिंगमध्ये भारताचा युवा रेसर नयन बॅनर्जी याने पोडियम फिनिश करताना लक्षवेधी कामगिरी केली.

Nayan Chatterjee falsified the tricolor | नयन चॅटर्जीने फडकवला तिरंगा

नयन चॅटर्जीने फडकवला तिरंगा

Next

रोहित नाईक,  मुंबई
गेल्याच आठवड्यात मलेशिया येथे झालेल्या आशिया रोटॅक्स मॅक्स चॅलेंज कार्टिंगमध्ये भारताचा युवा रेसर नयन बॅनर्जी याने पोडियम फिनिश करताना लक्षवेधी कामगिरी केली. विशेष म्हणजे याआधीच्या फेरीत झालेल्या अपघातामुळे नयनच्या कारच्या चेसीचे नुकसान झाले. यानंतर त्याने जुन्या चेसीसह रेस करूनही पोडियम स्थान मिळवले हे विशेष. यानंतर नयनने बेंगळुरू येथे ३ ते ५ जूनदरम्यान झालेल्या राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियनशिप शर्यतीतही चमकदार कामगिरी केली. सध्या तो मलेशिया येथे मॅक्स चॅलेंज कार्टिंगच्या
अंतिम रेसच्या तयारीत आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’ने त्याच्याशी साधलेला संवाद
मलेशियाची शर्यत किती आव्हानात्मक ठरली?
- या स्पर्धेत संपूर्ण आठवड्यापर्यंत टॉप ३ मध्ये होतो. मात्र, हीट २ फेरीमध्ये झालेल्या अपघातामध्ये माझ्या कारची चेसी वाकली गेल्याने ती कार चालवणे शक्य नव्हते. यानंतर मी २ वर्षे जुनी असलेल्या चेसीचा वापर करून तिसऱ्या स्थानी झेप घेतली.
या कामगिरीनंतर सर्वजण चकित झालो होते.
कोणत्या देशाच्या स्पर्धकांकडून आव्हान मिळाले?
- आम्ही मलेशियाच्या सर्वच ड्रायव्हर्सला नमवले. परंतु युरोप आणि इंडोनेशियाच्या ड्रायव्हर्सकडून टक्कर मिळाली. परंतु, पुढच्या रेसमध्ये मी त्यांच्यासमोर आव्हान उभे करेल.
तू कार्टिंगकडे कसा वळालास?
- सुरुवातीला मी टाइमपास म्हणून कार्टिंग करायचो. जोपर्यंत प्रत्येक दिवशी वेगवान फेरी झाल्याशिवाय मी तिथून निघायचो नाही. कधी कधी १० मिनिटे तर कधी कधी तब्बल ८ तास कार्टिंग करायचो. एकदा आईने टे्रनिंग कॅम्पविषयी वाचले आणी मला माझ्या टॅलेंटचा योग्य वापर करण्याबाबत संगितले. त्यानंतर त्या शिबिरातील पहिल्याच रेसमध्ये मी तिसरे स्थान मिळवले. ते माझ्यासाठी खूप मोठे यश होते.
तूझे स्वप्न काय आहे?
- मला या खेळामध्ये भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करायची आहे. युरोपियन ड्रायव्हर्समध्ये जी ताकद आहे ती भारतीयांमध्येही असल्याचे सिद्ध करायचे आहे. या खेळामध्ये भारतीयांना खूप कमी लेखले जाते आणि हा गैरसमज मला दूर करायचा आहे.
कार्टिंग तसा महागडा खेळ आहे, तर मध्यमवर्गीय याकडे कसे वळतील?
- मुळात मी स्वत: मध्यमवर्गातील आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुमच्यात गुणवत्ता असणे गरजेचे आहे. जर गुणवत्ता असेल तर पुरस्कर्ते सहजपणे मिळतात. काही शुभचिंतकही आहेत. त्यांच्यामुळे आणि पालकांमुळे आज मी यशस्वी आहे.
तुला कोणाचे मार्गदर्शन मिळत आहे?
- रेसिंग खेळातील दिग्गज
अकबर इब्राहीम यांचे मला
मार्गदर्शन मिळत आहे. तसेच स्टार रेसर नरेन कार्तिकेयनसारख्या
अनुभवी व दिग्गज खेळाडूंचेही मार्गदर्शन मिळत असते.
एफ वनसाठी योजना आहे का?
- मुळात एफवनची तयारी करणे खूप महागडे आहे. परंतु भविष्यात कोणी पुरस्कर्ते मिळाले तर नक्कीच एफवन रेसमध्ये सहभागी होईल. पण पुढील वर्षी एफ फोरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे ठरवले असून, त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Nayan Chatterjee falsified the tricolor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.