नयनचे विजेतेपदाचे लक्ष

By admin | Published: October 8, 2016 03:47 AM2016-10-08T03:47:12+5:302016-10-08T03:47:12+5:30

कारी मोटार स्पीड-वेवर शनिवार व रविवारी होणाऱ्या १९ वी जेके राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबईच्या नयन चॅटर्जीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Nayan's winner's attention | नयनचे विजेतेपदाचे लक्ष

नयनचे विजेतेपदाचे लक्ष

Next


कोईम्बतूर : येथील कारी मोटार स्पीड-वेवर शनिवार व रविवारी होणाऱ्या १९ वी जेके राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबईच्या नयन चॅटर्जीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
नयन सर्वांत जलद गटात आतापर्यंत अपराजित राहिला आहे. नयनने मागील दोन राऊंडमध्ये चार रेस जिंकत ५८ गुण मिळविले आहेत. तिसऱ्या राऊंडमध्ये चांगली कामगिरी करीत स्पर्धेच्या जेतेपदाची दावेदारी भक्कम करण्याकडे त्याचे लक्ष असणार आहे. नयनला बंगलोरच्या अनंत षणमुगम याच्याकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. त्याचे ४८ गुण आहेत. अनंतने मागील राऊंडमध्ये ३४ गुण मिळवित आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली होती.
एकूण १५ स्पर्धकांमध्ये कोल्हापूरच्या धु्रव मोहिते (३९ गुण) तिसऱ्या, तर हैदराबादच्या अनिदिता रेड्डी (३८) चौथ्या स्थानी आहेत. हे दोघेही स्पर्धेचा निकाल बदलविण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. तरच त्यांना पुढील महिन्यात ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटनॅशनल सर्किटवर होणाऱ्या अंतिम राऊंडमध्ये सहभागी होता येईल. राष्ट्रीय गो कार्टिंगचा नवा विजेता रिकी डोनिसन या स्पर्धेत सातव्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या राऊंडमधील खराब कामगिरीमुळे त्याला एकही गुण मिळविता आला नव्हता. जेके मोटार स्पोटर््सचे अध्यक्ष संजय शर्मा म्हणाले, ‘चॅम्पियनशिपच्या लढतीत काय होईल, हे सांगणे कठीण आहे. कारण सर्वच ड्रायव्हर आपले कौशल्य पणाला लावतील. ही स्पर्धा रोमांचक होईल असे मला वाटते.’
एलजीबी फॉर्म्युला ४ मध्ये मेको रेसिंग व डार्क डॉन यांच्या दरम्यान रंगतदार लढत होईल. मेकोकडून विष्णू प्रसाद व राहुल रंगास्वामी, तर डार्क डॉनकडून रोहित खन्ना व अश्विन सुंदर स्पर्धेत उतरतील. विष्णू ३६ गुणांसह सर्वांत पुढे असून, राहुल २७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेके टुरिंग कार प्रकारातील निकाल अगदी स्पष्ट आहे. आशिष रामास्वामी (८०) गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून, राजाराम ४५ गुणांसह दुसऱ्या, तर राधा सेल्वाराजन (३७) गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Nayan's winner's attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.