नायर, पांडे यांच्याकडे भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व
By Admin | Published: June 30, 2017 12:51 AM2017-06-30T00:51:38+5:302017-06-30T00:51:38+5:30
अनुभवी खेळाडू करुण नायर आणि मनीष पांडे यांची भारतीय ‘अ’ संघाच्या द. आफ्रिका दौऱ्यासाठी अनधिकृत कसोटी तसेच वन-डे संघाच्या
नवी दिल्ली : अनुभवी खेळाडू करुण नायर आणि मनीष पांडे यांची भारतीय ‘अ’ संघाच्या द. आफ्रिका दौऱ्यासाठी अनधिकृत कसोटी तसेच वन-डे संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. भारतीय संघ द. आफ्रिका तसेच आॅस्ट्रेलिया अ संघांसोबत तिरंगी वन-डे मालिका खेळल्यानंतर आफ्रिकेविरुद्ध चार दिवसांचे दोन कसोटी सामने खेळणार आहे.
भारताचा पहिला वन-डे आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध २६ जुलै रोजी होईल. करुण नायर आणि जयंत यादव हे सध्या सिनियर संघात असून पांडे जखमेतून पुनरागमन करीत आहे. वन-डेसाठी कुणाल पांड्या, रिषभ पंत, बसिल थम्पी, महंमद शिराज आणि सिद्धार्थ कौल यांची वर्णी लागली आहे. दुसरीकडे चार दिवसांच्या सामन्यांसाठी रणजी करंडकात शानदार कामगिरी करणारे प्रियांक पांचाल, ईशान किशन, सुदीप चॅटर्जी, अंकित बावणे आणि शाहबाज नदीम यांना स्थान देण्यात आले. अभिनव मुकंद हा देखील संघात आहे.
भारतीय सिनियर संघाचा श्रीलंका दौरादेखील २६ जुलैपासून सुरू होत असल्याने नायर कसोटी संघाचा खेळाडू असणार नाही. नायरने मागच्या सत्रात त्रिशतकी खेळीसह कसोटी करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र तो खराब
फॉर्मशी झुंजत आहे. आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा नियमित कर्णधार झहीर खानच्या अनुपस्थितीत त्याने काही सामन्यात नेतृत्व
केले. (वृत्तसंस्था)