बजरंग पहिल्या विश्व सुवर्णपदकाच्या जवळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 03:24 AM2018-10-22T03:24:09+5:302018-10-22T03:24:18+5:30
स्टार मल्ल बजरंग पूनिया याने अपेक्षित कामगिरी करताना उपांत्य फेरीत क्यूबाच्या अलेजांद्रो एनरिक तोबियेर याला ४-३ असे पराभूत करत विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पदकाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.
बुडापेस्ट : स्टार मल्ल बजरंग पूनिया याने अपेक्षित कामगिरी करताना उपांत्य फेरीत क्यूबाच्या अलेजांद्रो एनरिक तोबियेर याला ४-३ असे पराभूत करत विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पदकाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.
बजरंगने ६५ किलो वजनी गटात आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना अंतिम फेरीत धडक मारली. याआधी राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकलेल्या बजरंगने मंगोलियाच्या तुलगा तुमुर ओचिर याला ५-३ असे लोळवत उपांत्य फेरी गाठली. या स्पर्धेत सुशील कुमार यानेच भारतासाठी सुवर्ण जिंकले आहे. त्याने २०१० साली हा पराक्रम केला होता. बजरंग सुवर्ण जिंकण्यात यशस्वी ठरला, तर एकाच मोसमात तीन मोठ्या स्पर्धांमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरेल.