विजयासाठी ३३० धावांची गरज - धोनी
By admin | Published: January 15, 2016 07:49 PM2016-01-15T19:49:03+5:302016-01-15T19:50:56+5:30
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलगच्या दोन पराभवानंतर धोनीने पराभवाचे खापर गोलंदाजावर फोडले आहे. ‘गोलंदाजीचा दर्जा पाहता आता किमान 330 धावा कराव्या लागतील
Next
ऑनलाइन लोकमत
ब्रिस्बेन, दि. १५ - ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलगच्या दोन पराभवानंतर धोनीने पराभवाचे खापर गोलंदाजावर फोडले आहे. ‘गोलंदाजीचा दर्जा पाहता आता किमान ३३० धावा कराव्या लागतील‘ असे हताश वक्तव्य कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज दुसऱ्या सामन्यानंतर मध्यमांशी बोलताना केले.
सध्याच्या स्थितीत आमच्या गोलंदाजांची कामगिरी पाहता, फलंदाजांनी आणखी मेहनत घेऊन प्रतिस्पर्धी संघासमोर सुमारे ३३० धावांचे आव्हान ठेवले पाहिजे', असे मत कर्णधार महेंद्रसिग धोनीने या पराभवाचे विश्लेषण करताना मांडले. ' आम्ही आमच्या परीने सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण सर्वात शेवटी तुमचा परफॉर्मन्स महत्वाचा ठरतो. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी खरच उत्तम कामगिरी केली' असेही धोनी म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात तीनशेहून अधिक धावा केल्यानंतरही दोन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर धोनीने हे मत व्यक्त केले.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचे 309 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पार करत पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे. आता पुढील सामाना जिंकून मालिकेतील आव्हान जिंवत ठेवायचं असेल तर फलंदाजाला ३३० पेक्षा अधिक धावा बनवणं गरजेचं असल्याचं मत भारतीय कर्णधार ढोणी यानी व्यक्त केले आहे.
भारताकडून पहिल्या दोन्ही सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा व दोन्ही डावात अर्धसतक करणाऱ्या उपकर्णधार कोहलीच कौतूक करायला धोनी विसरला नाही. चेंडू जुना झाल्यानंतरही आम्ही यष्टींच्या दोन्ही बाजूंना ‘वाईड‘ चेंडू टाकले. फलंदाजांवर दडपण आणण्याची गरज असताना आम्ही ‘वाईड‘ चेंडू टाकले. त्या तुलनेत फिरकी गोलंदाजांनी चांगला मारा केला,‘‘ असे धोनी म्हणाला.