नवीन खेळाडू घडविण्यासाठी व्यवस्थेची गरज

By Admin | Published: November 2, 2015 12:17 AM2015-11-02T00:17:47+5:302015-11-02T00:17:47+5:30

दिग्गज टेनिसपटू रमेश कृष्णन डेव्हिस कपमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सातत्यपूर्वक चांगल्या कामगिरीने प्रभावित आहेत;

Need for system to create new players | नवीन खेळाडू घडविण्यासाठी व्यवस्थेची गरज

नवीन खेळाडू घडविण्यासाठी व्यवस्थेची गरज

googlenewsNext

पुणे : दिग्गज टेनिसपटू रमेश कृष्णन डेव्हिस कपमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सातत्यपूर्वक चांगल्या कामगिरीने प्रभावित आहेत; परंतु संघाला पुढच्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकणारे नवीन खेळाडू घडविणाऱ्या व्यवस्थेची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.
सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरी यांच्या नेतृत्वाखाली भारत सलग १६ देशांच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळविण्याचा दावेदार बनत आहे. त्यांनी सप्टेंबर २0१४ मध्ये सर्बिया आणि त्यानंतर एका वर्षाने झेक प्रजासत्ताकसारख्या अव्वल संघांना आव्हान दिले; परंतु पुढे जाण्यात ते अपयशी ठरले.
ते म्हणाले की, ‘आम्हाला एकेरीतील चांगल्या खेळाडूची आवश्यकता आहे. डेव्हिस कपमध्ये चार एकेरीचे सामने होतात आणि हे सत्य लपून राहिलेले नाही. विद्यमान खेळाडू कठोर मेहनत घेत आहेत आणि ते त्यांच्या कामगिरीत सुधारणा करीत राहतील; परंतु नवीन खेळाडू घडविणाऱ्या व्यवस्थेची आवश्यकता आहे.’ कृष्णन यांनी १९८७ मध्ये आॅस्ट्रेलियाच्या वॉली मसूर याच्याविरुद्ध पाचवी लढत जिंकताना भारताला डेव्हिस कपमध्ये अंतिम फेरीत पोहोचवले होते. त्यानंतर भारत फायनल्समध्ये पोहोचू शकला नव्हता.
युकी व साकेत मयनेनी याची रँकिंग सुधारणे हे चांगले संकेत आहेत; परंतु अजून पल्ला खूप लांब आहे, असे आॅस्ट्रेलिया ओपन १९८९ च्या पहिल्याच फेरीत त्या वेळेसचा नंबर वन खेळाडू मॅट्स विलेंडरवर सनसनाटी विजय नोंदणाऱ्या कृष्णन यांनी म्हटले. कृष्णन यांनी १९८१, १९८७ मध्ये यूएस ओपन आणि १९८६ मध्ये विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता. युकी टॉप १00 मध्ये आहे, तर सोमदेव आणि साकेत यांची रँकिंग १६0 ते १८0 यादरम्यान आहे. कृष्णन स्वत: आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम २३ व्या रँकिंगवर पोहोचले होते. कृष्णन यांना डेव्हिस कप कर्णधार म्हणून दुसऱ्या डावास सुरुवात करण्याची इच्छा आहे का, असे विचारले असता त्यांनी याविषयी इच्छा नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आमच्या जवळ
चांगला डेव्हिस कपचा संघ आहे आणि उत्तम कर्णधार आहे. सर्व काही व्यवस्थित आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Need for system to create new players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.