पदक जिंकण्यासाठी एका विजयाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 02:02 AM2018-04-04T02:02:48+5:302018-04-04T02:02:48+5:30
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोध्यांना मंगळवारी खूप चांगला ड्रॉ मिळाला असून, त्यात दिग्गज एम. सी. मेरी कोम हिला पदक जिंकण्यासाठी फक्त एक लढत जिंकण्याची गरज आहे, तर विकास कृष्णनला पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाला आहे.
गोल्डकोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोध्यांना मंगळवारी खूप चांगला ड्रॉ मिळाला असून, त्यात दिग्गज एम. सी. मेरी कोम हिला पदक जिंकण्यासाठी फक्त एक लढत जिंकण्याची गरज आहे, तर विकास कृष्णनला पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाला आहे.
मेरी कोम ८ एप्रिल रोजी ४८ किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या मेगन गॉर्डनशी भिडेल. प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणाऱ्या या मणिपूरच्या ३५ वर्षीय खेळाडूकडे सुवर्णपदकाचा दावेदार मानले जात असून, तिच्या गटात फक्त आठ खेळाडूंचा समावेश आहेत.
दुसरीकडे विकास (७५ किलो) याने अंतिम १६ जणांत स्थान मिळवले आहे. विकास आणि नवोदित खेळाडू मनीष कौशिक (६0 किलो) यांना बाय मिळाला आहे. आशियाई स्पर्धेत कास्यपदक जिंकणाºया सतीश कुमार (९१ पेक्षा जास्त) यालाही छोटा ड्रॉ मिळाला असून, तोही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. माजी विश्व व आशियाई विजेती एल. सरिता देवी (६0 किलो) किम्बरले गिटेंसविरुद्ध, तर इंडियन ओपन सुवर्ण विजेता अमित पंघाल (४९) घानाच्या टेट सुलेमानू याच्याविरुद्ध खेळेल.
ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत कास्यपदक जिंकणारी पिंकी जांगडा (५१ किलो) हीदेखील उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. ११ एप्रिलला इंग्लंडच्या लिसा व्हाईटसाईड हिच्याविरुद्ध तिची लढत होईल.
इंडियन ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकणाºया लवलिना बोर्गोहेन (६९ किलो) पहिल्या फेरीत मिळालेल्या बायद्वारे उपांत्यपूर्व फेरी गाठणारी एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे. तिची उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडच्या सँडी रायन हिच्याशी गाठ पडेल.
पुरुष गटातील सर्वात युवा सदस्य नमन तंवर (९१ किलो) हा ६ एप्रिलला पहिल्या फेरीत तांजानियाच्या हारुणा म्हांदो याच्याविरुद्ध खेळेल. २0१0 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मनोज कुमार (६९ किलो) याची ५ एप्रिल रोजी पहिल्या फेरीत नायजेरियाच्या ओसिता उमेह याच्याविरुद्ध लढत होईल. मुहंमद हुस्सामुद्दीन (५६ किलो) ७ एप्रिलला वुनुआतू बो वारावारा याच्याविरुद्ध, तर गौरव सोळंकी ९ एप्रिलला घानाच्या अन्नंग अम्पियासविरुद्ध लढेल.