टर्निंग विकेटवर फलंदाजांनी संयम राखण्याची गरज : शास्त्री

By admin | Published: December 13, 2015 02:30 AM2015-12-13T02:30:04+5:302015-12-13T02:30:04+5:30

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत विजय मिळवल्यानंतरही संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी भारतीय फलंदाजांना ‘टर्निंग विकेट’वर संयम राखण्याची

Needing to maintain patience on a turning wicket: Shastri | टर्निंग विकेटवर फलंदाजांनी संयम राखण्याची गरज : शास्त्री

टर्निंग विकेटवर फलंदाजांनी संयम राखण्याची गरज : शास्त्री

Next

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत विजय मिळवल्यानंतरही संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी भारतीय फलंदाजांना ‘टर्निंग विकेट’वर संयम राखण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
शास्त्री यांनी बीसीसीआयच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराट कोहलीचे नेतृत्व आणि अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांच्या फलंदाजीची प्रशंसा केली.
शास्त्री म्हणाले, ‘भारतीय संघासाठी अडचण ही आहे, की आमचे खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळत नाही आणि यात त्यांची चूक नाही. भारतीय संघाचा कार्यक्रम व्यस्त आहे. त्यामुळे फूटवर्क आणि टर्निंग खेळपट्ट्यांवर फूटवर्कमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. टर्निंग खेळपट्ट्यांवर उणिवा स्पष्ट होतात.’
शास्त्री पुढे म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत भारतीय संघ विदेशात खेळला. ज्यावेळी मायदेशात खेळावे लागले त्यावेळी परिस्थिती बदललेली होती.’
शास्त्री यांनी रहाणेची प्रशंसा केली. रहाणेने पहिल्या दोन कसोटी सामन्यांत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या लढतीत शानदार पुनरागमन केले. पहिल्या लढतीत तो बचावात्मक फटका खेळताना तर दुसऱ्यांदा तो आक्रमक फटका खेळताना बाद झाला. दिल्ली कसोटीत मात्र त्याने कामगिरीत सुधारणा केली.’ विराट कोहलीच्या नेतृत्वाची शास्त्री यांनी प्रशंसा करताना म्हटले, की ‘९ डिसेंबर २०१४ रोजी कोहलीने प्रथमच अ‍ॅडिलेडमध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. वर्षभरानंतर तो जिगरबाज संघाचे नेतृत्व करीत आहे, असे वक्तव्य करू शकतो. विराट प्रत्येक ठिकाणी असतो आणि प्रत्येकासोबत संवाद साधतो. कर्णधारामध्ये ही कला असणे आवश्यक असते. (वृत्तसंस्था)

Web Title: Needing to maintain patience on a turning wicket: Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.