काही चेंडू राखून जिंकायला हवे होते : स्मिथ

By Admin | Published: April 18, 2015 01:43 AM2015-04-18T01:43:24+5:302015-04-18T01:43:24+5:30

विशाखापट्टणम : इंडियन प्रिमियर लीगच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. त्यानंतर ही लढत शेवटच्या चेंडूआधीच जिंकायला हवी होती, असे मत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने व्यक्त केले.

Needing to win some balls: Smith | काही चेंडू राखून जिंकायला हवे होते : स्मिथ

काही चेंडू राखून जिंकायला हवे होते : स्मिथ

googlenewsNext
शाखापट्टणम : इंडियन प्रिमियर लीगच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. त्यानंतर ही लढत शेवटच्या चेंडूआधीच जिंकायला हवी होती, असे मत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने व्यक्त केले.
सनरायजर्सने दिलेल्या १२८ धावांचा पाठलाग करताना रॉयल्सने अजिंक्य रहाणे (६२) याच्या धीरोदात्त खेळीच्या बळावर २0 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर १३१ धावा करीत विजयी लक्ष्य ४ गडी गमावून पूर्ण केले.
सामन्यानंतर स्मिथ म्हणाला, हा सामना अपेक्षेपेक्षा जास्त चुरशीचा ठरला; परंतु आम्ही महत्त्वाचे गुण मिळवण्यात यशस्वी ठरलो. हा सामना अखेरपर्यंत न जाता आधीच जिंकायला हवा होता. आमच्याकडे काही चांगले भारतीय खेळाडू असून ते चांगले खेळत आहेत. खेळपट्टी पूर्ण सामन्यादरम्यान सारखीच ठरली. सामना जिंकणे सुखद ठरले..
दुसरीकडे सनरायजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने त्यांची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नसल्याचे म्हटले आहे.
वॉर्नर म्हणाला, 'हा सामना अटीतटीचा झाला; परंतु ते चांगले खेळले. आम्ही अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलो नाही.'
सामनावीर आणि पर्पल कॅप प्राप्त करणार्‍या रहाणेने स्वत:च्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, 'मी ज्या प्रकारे फलंदाजी केली त्याने मी खुश आहे. संघ म्हणूनही आम्ही चांगली कामगिरी केली. खेळपट्टी थोडी संथ होती आणि आपण नेहमीप्रमाणेच फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला.' (वृत्तसंस्था)

Web Title: Needing to win some balls: Smith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.