Neeraj Chopra : नीरज चोप्राला विचारलं, लांब केस का कापले? उत्तर ऐकून म्हणाल- शाब्बास रे पठ्ठया!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 07:07 PM2021-08-10T19:07:57+5:302021-08-10T19:08:42+5:30

Neeraj Chopra : ऑलम्पिकमध्ये त्याच्याबाबत एक गोष्ट आश्चर्यकारकपणे वेगळी होती. ती म्हणजे यावेळी त्याचे लांब केस गायब होते. नीरजला सोमवारी भारतात परतल्यावर सन्मानित करण्यात आलं.

Neeraj Chopra asked why he cut his long hair, he gives superb answer | Neeraj Chopra : नीरज चोप्राला विचारलं, लांब केस का कापले? उत्तर ऐकून म्हणाल- शाब्बास रे पठ्ठया!

Neeraj Chopra : नीरज चोप्राला विचारलं, लांब केस का कापले? उत्तर ऐकून म्हणाल- शाब्बास रे पठ्ठया!

googlenewsNext

नीरज चोप्राने (Neeraj Chopra) हा टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतातील सर्वात मोठा स्टार होता. त्याने अ‍ॅथलेटिक्समध्ये देशाला पहिलं ऑलम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिलं. पण ऑलम्पिकमध्ये त्याच्याबाबत एक गोष्ट आश्चर्यकारकपणे वेगळी होती. ती म्हणजे यावेळी त्याचे लांब केस (Neeraj Chopra Long Hair)  गायब होते. नीरजला सोमवारी भारतात परतल्यावर सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना त्याने याबाबत खुलासा केला की, त्याने ऑलम्पिकसाठी आपला लूक चेंज का केला. तो म्हणाला की, 'मी वयाच्या ९-१० वर्षापासून लांब केस ठेवतो, पण नंतर मला लांब केसांमुळे त्रास होऊ लागला होता'.

नीरजने सांगितलं की, 'काही स्पर्धामध्ये लांब केसांमुळे मला घाम जास्त येत होता आणि केस माझ्या डोळ्यांवर येत होते. मी हेअर बॅंडचाही वापर केला. पण ते तरी त्रासदायक ठरत होते. तेव्हा मी विचार केला की, हे ऑलम्पिक आहे. स्टाइल काय नंतर करता येईल, खेळ आधी आहे'. (हे पण वाचा : 'तुझ्या हेअरस्टाईलचं रहस्य काय? शाहरुख की ईशांत?'; सुवर्ण पदक विजेता नीरज म्हणतो...)

नीरज चोप्रा पुरूषांच्या भालाफेक फायनलमध्ये ८७.५८ मीटरचा सर्वोत्कृष्ठ थ्रो करून टोकियोमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. हा त्याच्या सहा थ्रो पैकी दुसरा होता आणि भाला खाली पडण्याआधीच त्याने जल्लोष सुरू केला होता. तो म्हणाला की, 'होय, शरीराने केलेल्या प्रयत्नामुळे मला समजलं होतं की, हा थ्रो खास आहे. मला वाटलं होतं की, हा माझा व्यक्तिगत सर्वोत्कृष्ठ थ्रो आहे, पण तो थोडा कमी होता'.

तो म्हणाला की, 'आपल्याला आपल्या शरीरावरून जाणवतं आणि दुसऱ्या दिवशी माझं पूर्ण अंग, माझे खांदे, हात दुखत होते. पण जेव्हा मी पदक जिंकलं तर त्या वेदना काहीच नसतात'.
 

Web Title: Neeraj Chopra asked why he cut his long hair, he gives superb answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.