नीरज चोप्रा IPL मध्ये गोलंदाज म्हणून खेळण्यास तयार, परंतु ठेवली एक अट; पाहा मजेशीर Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 22:18 IST2023-05-04T22:17:48+5:302023-05-04T22:18:23+5:30
हरयाणात क्रिकेट पाहत लहानाचा मोठा झालेल्या नीरजला भारतात क्रिकेटचं किती वेड आहे याची कल्पना आहे.

नीरज चोप्रा IPL मध्ये गोलंदाज म्हणून खेळण्यास तयार, परंतु ठेवली एक अट; पाहा मजेशीर Video
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) हा केवळ त्याच्या भविष्याबाबत विचार करत नाही, परंतु त्यानंतर काय करणार याचाही विचार त्याने केला आहे. दोहा येथे डायमंड लिगसाठी नीरज दाखल झाला आहे आणि त्यावेळी त्याने क्रिकेटपटू बनण्याबद्दल जोक केला. हरयाणात क्रिकेट पाहत लहानाचा मोठा झालेल्या नीरजला भारतात क्रिकेटचं किती वेड आहे याची कल्पना आहे. भालाफेकीतून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेटपटू बनणार का असा सवाल नीरजला केला गेला अन् त्यावर टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूने मजेशीर उत्तर दिले. फक्त त्याने एक अट ठेवली, की गोलंदाजी करताना हात बेंड करण्याचा नियम त्याच्यासाठी नसावा.
ICC च्या नियमानुसार चेंडू फेकणे हे चुकीचे आहे. ''क्रिकेट हाही शारीरिक तंदुरुस्तीचा खेळ आहे. खांद्यापासून हात वाकवण्याचा नियम बदलला आणि त्यांनी मी जसा भाला फेकतो अशी चेंडू फेकण्याची मुभा दिली, तर मी क्रिकेटपटू बनण्याचा विचार करू शकतो,''असे नीरज म्हणाला.
"If you could bowl like we throw the javelin, I'd be playing in the @IPL"
— Wanda Diamond League (@Diamond_League) May 4, 2023
Who wants to see @neeraj_chopra1 firing yorkers at @fafduplessis, @davidwarner31 and @imVkohli? 😉#DohaDL#DiamondLeaguepic.twitter.com/RbKkKHBQOV
"क्रिकेट हा भारतात खूप लोकप्रिय खेळ आहे आणि क्रिकेटमधील गोलंदाजांना अतिशय वेगवान हाताची आवश्यकता असते. त्यामुळे हे कौशल्य भारतातील बहुतेक खेळाडूंना नैसर्गिकरित्या येते," तो पुढे म्हणाला. नीरज त्याच्या सत्राची सुरुवात दोहा डायमंड लीगमध्ये करेल. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याने डायमंड ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला, डायमंड लीग स्पर्धांच्या अंतिम फेरीत ८७.४४ मीटर थ्रोसह विजेतेपद पटकावले होते. नीरजसमोर जेतेपद कायम राखण्याचे आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज होण्याचे आव्हान आहे.