तुर्कीमधून मायदेशी परतणार नीरज चोप्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 04:10 AM2020-03-18T04:10:25+5:302020-03-18T04:12:12+5:30
२२ वर्षीय नीरज गेल्या एक महिन्यापासून तुर्कस्थानमध्ये सराव करत होता. त्याने दुखापतीनंतर दक्षिण आफ्रिकेत एका स्पर्धेत ८७.८६ मीटर भाला फेक करत टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती.
नवी दिल्ली : टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा कोरोनामुळे तुर्कस्थानमधून भारतात परतणारआहे. २२ वर्षीय नीरज गेल्या एक महिन्यापासून तुर्कस्थानमध्ये सराव करत होता. त्याने दुखापतीनंतर दक्षिण आफ्रिकेत एका स्पर्धेत ८७.८६ मीटर भाला फेक करत टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती.
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या अधिकाऱ्याने सांगितले की,‘ तुर्कस्थान १८ मार्चला त्यांच्या सीमा बंद करणार असून त्याआधी नीरजला भारतात परतावे लागेल. तो बुधवारी मायदेशी पोहचेल. तसेच तो डायमंड लीगमध्ये १७ एप्रिलला होणाºया दोहा येथील सत्रातही सहभागी होणार नाही.’
डायमंड लीगच्या पहिल्या तीन स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचे याआधीच आयोजकांनी स्पष्ट केले.
अन्य भालाफेकपटू शिवपाल सिंगही द. आफ्रिकेतून परतणार आहे. त्यानेही टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. एएफआय अधिकाºयाने म्हटले की,‘ शिवपालही द. आफ्रिकेतून येत आहे. कोणताही भारतीय खेळाडू विदेशात सराव करत नाही. अशी स्थितीत कोणताही देश सीमा बंद करु शकतो. त्यामुळे आम्ही धोका पत्करणार नाही.’ (वृत्तसंस्था)
डायमंड लीगच्या सर्व स्पर्धा रद्द
पॅरिस : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डायमंड सर्किटच्या तीन स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. यात दोहा येथे १७ एप्रिल मध्ये होणारी स्पर्धा, शांघाई येथे १६ मे रोजी होणारी व चीनमधील ९ मे रोजी होणारी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हा निर्णय आयोजन समिती, स्थानिक अधिकारी, क्रीडा संघटनांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल.
जर्मन फुटबॉल स्थगित
फ्रॅँकफर्ट : जर्मनीमधील आघाडीच्या २६ फुटबॉल क्लबने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जर्मन फुटबॉल लीग स्थगित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बुंदेसलिगा व दुसऱ्या दर्जाच्या संघांनी फ्रॅँकफर्ट येथे झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली. जमर्न फुटबॉल लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी
क्रिस्टियन सिफर्ट म्हणाले, ‘हा निर्णय झाला असला तरी यानंतर आम्ही लगेच सामने सुरु करणार आहोत असे नाही. ही लीग कधी सुरु होईल हे आताच सांगता येणार नाही. ’ (वृत्तसंस्था)