एकच वार, सारे गार! नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात फायनल अन् ऑलिम्पिक तिकीट केलं पक्कं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 02:19 PM2023-08-25T14:19:04+5:302023-08-25T14:19:33+5:30
World Athletics Championship - भारताच गोल्डन बॉय नीरज चोप्राने ( Neeraj Chopra) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला.
World Athletics Championship - भारताच गोल्डन बॉय नीरज चोप्राने ( Neeraj Chopra) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारातील पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकून अंतिम फेरीतील जागा पक्की केली. यासह त्याने २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचेही ( पात्रता मार्क - ८५.५० मीटर) तिकीट पटकावले. भारताच्या डी. पी. मनूने पहिल्यात प्रयत्नात ७८.१० मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात ८१.३१ मीटर लांब भाला फेकला. ८३.०० मीटर हा पात्रता मार्क होता अन् नीरजने पहिल्याच प्रयत्नात सर्वात लांब भाला फेकला. जर्मनीच्या ज्युलियन वेबर ८१.०५ मीटरसह टॉपर राहिला, तर गतविजेत्या पीटर अँडरसनला ७८.०२ मीटर लांब भाला फेकता आला.
The #WACBudapest23 men’s Javelin Throw (Group A) is underway. Manu DP launches a 78.10m throw in his first attempt. #Budapest23#Javelin#CraftingVictories 🇮🇳 pic.twitter.com/kSZ0wLQutB
— Inspire Institute of Sport (@IIS_Vijayanagar) August 25, 2023
जुलै २०२३ मध्ये त्याने सलग दुसऱ्यांदा डायमंड लीग जिंकली. नीरजने पाचव्या प्रयत्नात ८७.६६ मीटर भालाफेक करून ही लीग जिंकली. त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते आणि त्याने त्याच्या कामगिरीत आज सुधारणा करून भाला आणखी दूर फेकला.
मागच्या वर्षी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले आणि ल्युसाने डायमंड लीगमध्ये ८९.०८ मीटर भालाफेक करून डायमंड लीग फायनलमधील जागा पक्की केली होती. सप्टेंबरमध्ये झ्युरिच येथे झालेल्या फायनलमध्ये त्याने ८८.४४ मीटरसह बाजी मारली अन् ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता.
Neeraj Chopra opening throw in qualification 88.77m. He has qualified for medal round.
— Athletics Federation of India (@afiindia) August 25, 2023
Automatic qualification 83m. Or best 12 advance to final#Budapest2023#WorldAthleticsChampspic.twitter.com/fRQaTrBTI0