'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 23:36 IST2024-09-17T23:35:49+5:302024-09-17T23:36:43+5:30
Neeraj Chopra undergoes surgery: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीग दुखावलेल्या हाताने पटकवाले होते दुसरे स्थान

'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
Neeraj Chopra undergoes surgery: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने १४ सप्टेंबरच्या रात्री डायमंड लीग फायनलमध्ये दुखापतग्रस्त हाताने दुसरे स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. त्याला डायमंड ट्रॉफी जिंकता आली नाही. हाताला झालेली दुखापत हेच त्यामागचे कारण होते. पण आता त्याच्या दुखापतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नीरज चोप्राच्या हातावर सोमवारी (१६ सप्टेंबर) स्वित्झर्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. नीरजची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. १५ सप्टेंबरला डायमंड लीगच्या फायनलनंतर नीरजने स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याच्या दुखावलेल्या हाताबाबत खुलासा केला होता.
'डाव्या हाताच्या चौथ्या मेटाकार्पल हाडात फ्रॅक्चर'
फायनलनंतर नीरजने लिहिले होते, '२०२४ चा सीझन संपत असताना, मी वर्षभरात शिकलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवत आहे. त्यात सुधारणा, अपयश, मानसिकता आणि बरेच कंगोरे आहेत. सोमवारी (९ सप्टेंबर) मला सरावाच्या वेळी दुखापत झाली आणि माझ्या डाव्या हाताचे चौथे मेटाकार्पल हाड फ्रॅक्चर झाल्याचे समजले. पण माझ्या टीमच्या (डॉक्टरांच्या) मदतीने मी ब्रुसेल्समध्ये डायमंड लीग फायनल्स खेळलो.
नीरजचा केवळ १ सेंटीमीटर फरकाने पराभव
नीरज चोप्राला ९ सप्टेंबरला सरावादरम्यान ही दुखापत झाली होती. वैद्यकीय पथकाच्या मदतीने तो डायमंड लीगचा अंतिम सामना खेळू शकल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, तो विजेतेपदापासून वंचित राहिला आणि त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८७.८७ मीटर फेक करून विजेतेपद पटकावले. तर नीरजचा सर्वोत्तम थ्रो ८६.४६ होता. म्हणजेच नीरज फक्त १ सेंटीमीटरने मागे राहिला.