Paris Olympics 2024 : 'गोल्डन बॉय'ची मॅच कधी? नीरज चोप्राकडून तमाम देशवासियांना पदकाची आशा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 04:22 PM2024-08-01T16:22:53+5:302024-08-01T16:22:58+5:30

Neeraj Chopra In Paris Olympics 2024 : नीरज चोप्रा पुन्हा एकदा सोनेरी कामगिरी करतो का हे पाहण्याजोगे असेल.

  Neeraj Chopra's first match in Paris Olympics 2024 will be held on August 6 | Paris Olympics 2024 : 'गोल्डन बॉय'ची मॅच कधी? नीरज चोप्राकडून तमाम देशवासियांना पदकाची आशा!

Paris Olympics 2024 : 'गोल्डन बॉय'ची मॅच कधी? नीरज चोप्राकडून तमाम देशवासियांना पदकाची आशा!

neeraj chopra match olympic 2024 : २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. मनू भाकरने वैयक्तिक एक आणि मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीने एक पदक जिंकले. याशिवाय गुरुवारी मराठमोळा खेळाडू स्वप्नील कुसाळेने कांस्य पदकाला गवसणी घातली. तमाम देशवासियांना भालाफेकपटू नीरज चोप्राच्या लढतीची प्रतीक्षा आहे. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने सुवर्ण पदक जिंकण्याची किमया साधली होती. त्यामुळे नीरज चोप्रा पुन्हा एकदा सोनेरी कामगिरी करतो का हे पाहण्याजोगे असेल.

नीरज ६ ऑगस्ट रोजी मैदानात दिसेल. या दिवशी भारताचा गोल्डन बॉय भालाफेक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करेल. भालाफेकीच्या गट-अ ची पात्रता फेरी दुपारी १.५० वाजता सुरू होईल, तर गट-ब ची पात्रता फेरी दुपारी ३.२० वाजता सुरू होईल. तर, अंतिम फेरी ८ ऑगस्ट रोजी दुपारी ११.५५ वाजता होईल. टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावले होते. नीरजने ८७.५८ मीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकले. आता पुन्हा एकदा नीरजकडून इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि भारताच्या खात्यात सुवर्ण पदक येईल अशी अपेक्षा आहे. 

दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये बुधवारचा दिवस भारतासाठी खूप खास राहिला. पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, श्रीजा अकुला, स्वप्नील कुसाळे आणि लवलीना बोरगोहेन यांनी विजय संपादन केला. महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या स्वप्नीलने अंतिम फेरी गाठली अन् गुरुवारी देशवासियांना कांस्य जिंकून खुशखबर दिली. भारताला शूटींमधून आणखी एक पदक मिळाले असून, एकूण तीन पदकांची नोंद झाली आहे. कोल्हापूरच्या पठ्ठ्याने ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने अंतिम फेरीत धडक मारली अन् मोठे यश मिळवले.

Web Title:   Neeraj Chopra's first match in Paris Olympics 2024 will be held on August 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.