नीरज उपांत्य फेरीत पराभूत; तरीही आॅलिम्पिकच्या आशा कायम
By admin | Published: July 8, 2016 12:55 AM2016-07-08T00:55:18+5:302016-07-08T00:55:18+5:30
व्यावसायिक बॉक्सर्ससाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताचा बॉक्सर नीरज गोयत याला उपांत्य फेरीत पराभवाचा
नवी दिल्ली : व्यावसायिक बॉक्सर्ससाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताचा बॉक्सर नीरज गोयत याला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना कराव लागला. मात्र यानंतरही आॅलिम्पिक तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत नीरज कायम आहे.
व्हेनेज्युएलाच्या वारगास येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत विद्यमान डब्ल्यूबीसी आशियाई विजेता नीरजला द्वितीय मानांकीत जर्मनीच्या अराजिक मारुतजान विरुध्द ०-३ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतरही आॅलिम्पिक पात्रता मिळवण्याची आणखी एक संधी नीरजकडे आहे. नीरज खेळत असलेल्या ६९ किलोवजनी गटातून तिसरा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारा खेळाडू निश्चित करण्यासाठी बॉक्स-आॅफ खेळविण्यात येईल. यामध्ये नीरजचा सामना स्पेनच्या सिसोखो एनदियाये यौउबाविरुध्द होईल. त्याचवेळी अंतिम फेरीत पोहचलेल्या दोन्ही बॉक्सर्सना आॅलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळले. (वृत्तसंस्था)