भालाफेकमध्ये नीरज फायनलसाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:00 AM2018-04-14T02:00:21+5:302018-04-14T02:00:21+5:30
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्या प्रयत्नात पात्रता निकष पूर्ण करताना गटात दुसरे स्थान पटकावित फायनल्ससाठी पात्रता मिळवली.
गोल्ड कोस्ट : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्या प्रयत्नात पात्रता निकष पूर्ण करताना गटात दुसरे स्थान पटकावित फायनल्ससाठी पात्रता मिळवली. विपिन कासनाने पुरुष भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवले.
च्नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८०.४२ मीटर भालाफेक करीत पात्रता मिळवली. तो एकूण चौथ्या स्थानी राहिला. १२ क्वालिफायरपैकी सात खेळाडूंनी पात्रता निकष पूर्ण केले. नीरजचा ज्युनिअर सहकारी कासनाने पहिल्या थ्रोमध्ये ७८.८८ मीटर अंतर गाठताना फायनलमध्ये स्थान मिळवले.
च्पुरुषांच्या १५०० मीटर स्पर्धेत जिनसन जॉन्सन आपल्या हीटमध्ये दुसऱ्या स्थानी राहिला तर एकूण आठव्या स्थानी राहताना अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. त्याने ३ मिनिट ४७.०४ सेकंद वेळेत अंतर पूर्ण केले.
पुरुषांच्या ४ बाद ४०० मीटर रिलेमध्ये सुरेश जीवन, अमोज जॅकब, मोहम्मद अनस व राजीव अरोकिया यांनी शनिवारी होणाºया फायनलसाठी पात्रता मिळवली. टीमने हीटमध्ये ३ मिनिट ०४.०५ सेकंदची वेळ नोंदवताना दुसरे स्थान पटकावले. पौर्णिमा हेम्बराम महिला हप्टाथलॉनमध्ये सातव्या स्थानी राहिली. तिने सात स्पर्धांमध्ये ५८३४ अंकांची नोंद करीत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली.